India vs Australia T20 सामना हरल्यानंतर भारतीय क्रिकेट संघ सोशल मीडियावर ट्रोल
भारतीय क्रिकेट संघ सोशल मीडियावर ट्रोल Photo Credit : Twitter

India vs Australia: भारत ऑस्ट्रेलिया दरम्यान आज खेळल्या गेलेल्या पहिल्याच सामन्यामध्ये भारताला पराभवाचा सामना करावा लागला आहे. सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असणाऱ्या भारतीय संघाला आज 3 T-20, 4 टेस्ट आणि 3 वनडे मॅचची सीरिज खेळायची आहे. पहिल्याच सामन्यात पावसाचा व्यत्यय आल्याने भारत ऑस्ट्रेलिया सामना 17 षटकांचा करण्यात आला. ऑस्ट्रेलियाने 4 बाद 158 धावा केल्या होत्या मात्र पावसामुळे भारताला 17 षटकात डकवर्थ लुईस नियमानुसार 174 धावांचे आव्हान देण्यात आले होते. अखेरच्या टप्यावर रोमांचक झालेल्या सामान्यात ऑस्ट्रेलियाने भारतावर ४ धावांनी विजय मिळवला.

दमदार ऑस्ट्रेलियासमोर टिकून राहताना भारतीय खेळाडूंची दमछाक होत होती. संथ गतीतच सुरु झालेल्या या सामन्यात भारतीय खेळाडूंचा परफॉर्मन्स पाहून सोशल मीडियामध्ये मिम्सचा पाऊस पडायला सुरुवात झाली आहे. ट्विटरवर कृणाल पांड्या (Krunal Pandya), बुमराह सह भारतीय खेळाडूंच्या कामगिरीची खिल्ली उडवली जात आहे.

भारत ऑस्ट्रेलिया सामन्यांदरम्यान  भारताचं क्षेत्ररक्षण कमजोर होतं. हेच भारताच्या पराभवाचं प्रमुख कारण ठरलं. जसप्रीत बुमराहच्या बॉलवर पहिल्यांदा  विराट कोहलीनं आणि मग खलील अहमदनं कॅच सोडला. यामुळे बुमराह मैदानातच भडकलेला पाहायला मिळाला. रोमांचक बनलेल्या मॅचमध्ये शेवटच्या ओव्हरमध्ये भारताला विजयासाठी १२ रनची आवश्यकता होती. पण मार्कस स्टॉयनिसनं  कृणाल पांड्या आणि  दिनेश कार्तिकची  विकेट घेऊन भारताचा विजयाचा घास हिरावून घेतला.