India vs Australia T 20 : ऑस्ट्रेलियाची भारतावर 4 धावांनी मात
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया Photo Credit :twitter

India vs Australia: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया या सामन्याची आजपासून सुरुवात झाली आहे. पहिल्याच सामन्यात ऑस्ट्रेलियाने विजयी सलामी ठोकली आहे. भारतावर ऑस्ट्रेलियाने 4 धावांनी मात केली आहे. ऑस्ट्रेलियाने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. पावसामुळे भारत ऑस्ट्रेलिया सामना 17 षटकांचा  करण्यात आला. ऑस्ट्रेलियाने 4 बाद 158 धावा केल्या होत्या मात्र पावसामुळे भारताला 17 षटकात डकवर्थ लुईस नियमानुसार 174 धावांचे आव्हान देण्यात आले होते.

भारताने सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. शिखर धवनने आपल्या दमदार फलंदाजीने अर्धशतक ठोकले.  मात्र तो 76 धावांवर बाद झाला.  भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यात क्रिस लिन आक्रमक खेळताना दिसला. सातव्या ओव्हरमध्ये क्रिस लिनने खलील अहमदच्या बॉलवर 3 सिक्स मारले. क्रिस लिनने 20 बॉलमध्ये 37 रन केले. त्याने या इनिंगमध्ये 4 सिक्स आणि 1 फोर मारला.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या भारतीय क्रिकेट संघाला  3 T-20, 4 टेस्ट आणि 3 वनडे मॅचची सीरिज खेळायची आहे. या खडतर दौऱ्याची सुरुवातT-20 सीरिजनं होणार आहे. ऑस्ट्रेलियातील मागील दौऱ्यात भारताने ऑस्ट्रेलियाला T-20 मध्ये त्यांच्याच भूमीत 3-0 नं नमवण्याची किमया केली होती.