Close
Search

Power Outage: अनियमित वीज पुरवठ्याच्या त्रासाला कंटाळून गेल्या 10 महिन्यांपासून कर्नाटकातील शेतकरी मिक्सरमध्ये मसाला दळण्यासाठी आणि फोन चार्ज करण्यासाठी दररोज जातो वीज कार्यालयात

एम हनुमंथप्पा (M Hanumanthappa) असं या शेतकऱ्याचं नाव आहे. हनुमंथप्पा दररोज त्यांच्या घराजवळील मंगलोर इलेक्ट्रिसिटी सप्लाय कंपनी लिमिटेड (मेस्कॉम) च्या कार्यालयात मिक्सर घेऊन मसाला बारीक करण्यासाठी तसेच आपला मोबाईल फोन चार्च करण्यासाठी जातो. हनुमंथप्पा सुमारे 10 महिन्यांपासून मसाला बारीक करण्यासाठी मिक्सर घेऊन वीज कार्यालयात येत आहे.

व्हायरल Bhakti Aghav|
Power Outage: अनियमित वीज पुरवठ्याच्या त्रासाला कंटाळून गेल्या 10 महिन्यांपासून कर्नाटकातील शेतकरी मिक्सरमध्ये मसाला दळण्यासाठी आणि फोन चार्ज करण्यासाठी दररोज जातो वीज कार्यालयात
Man visits power department office to grind masala (PC - Twitter)

Power Outage: कर्नाटकातील शिवमोग्गा जिल्ह्यातील (Shivamogga District in Karnataka) मंगोटे गावातील एक शेतकरी मसाले दळण्यासाठी आणि फोन चार्ज करण्यासाठी दररोज जवळच्या वीज कार्यालयात जातो. एम हनुमंथप्पा (M Hanumanthappa) असं या शेतकऱ्याचं नाव आहे. हनुमंथप्पा दररोज त्यांच्या घराजवळील मंगलोर इलेक्ट्रिसिटी सप्लाय कंपनी लिमिटेड (मेस्कॉम) च्या कार्यालयात मिक्सर घेऊन मसाला बारीक करण्यासाठी तसेच आपला मोबाईल फोन चार्च करण्यासाठी जातो. हनुमंथप्पा सुमारे 10 महिन्यांपासून मसाला बारीक करण्यासाठी मिक्सर घेऊन वीज कार्यालयात येत आहे. विशेष म्हणजे हनुमंथप्पाच्या या कृतीला वीज कार्यालयातील अधिकाऱ्यांची काहीही हरकत नाही.

प्राप्त माहितीनुसार, हनुमंथप्पाच्या कुटुंबाला दिवसाचे 3-4 तास वीज मिळते. न्यूज18 ने प्रकाशित केलेल्या वृत्तानुसार, शेतकऱ्याने आपल्या घरी योग्य वीज पुरवठा व्हावा यासाठी मेस्कॉम आणि अनेक संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. परंतु, त्याचा काही उपयोग झाला नाही. त्यांनी स्थानिक आमदाराला विनंतीही केली. मात्र, याचादेखील हनुमंथप्पाला काहीही उपयोग झाला नाही. (हेही वाचा - Black Heron Viral Video: काळ्या बगळ्याने चतुराईने लावले मासेमारीसाठी जाळे; व्हायरल व्हिडिओमधील त्याची अटकल पाहून तुम्हीही व्हाल थक्क, Watch)

एक दिवशी हनुमंथप्पाने मेस्कॉमच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याला फोन करून विचारले की, ते आपल्या घरातील मसाले कसे दळतात आणि फोन कसा चार्ज करतात? या मुलभूत गरजा आहेत. मी यासाठी माझ्या शेजाऱ्याच्या घरी रोज जाऊ शकत नाही. अधिकारी चकित करत त्याला म्हणाला, "मग तू मेस्कॉमच्या ऑफिसमध्ये जा आणि मसाले बारीक कर. हनुमंथप्पाने अधिकाऱ्याने दिलेला सल्ला गांभीर्याने घेतला आणि त्याने त्यादिवशीपासून वीज कार्यालयात जाणून मसाला बारीक करण्याचा दिनक्रम चालू ठेवला.

मेस्कॉमचे कनिष्ठ अभियंता विश्वनाथ यांनी सांगितले की, मुसळधार पावसामुळे आयपी सेट चार्ज होऊ शकला नाही. हनुमंथप्पा यांना मल्लपुरा वितरण केंद्रातून वीजवाहिनी खेचून तात्पुरता वीजपुरवठा मिळू शकतो. महिनाभरात त्यांच्या घराला वीज जोडणी मिळेल, असे या अधिकाऱ्याने सांगितले.

हनुमंथप्पा यांनी मेस्कॉम कार्यालयाला भेट दिल्यानंतर त्यांचे व्हिडिओ आणि छायाचित्रे मोठ्या प्रमाणावर ऑनलाइन प्रसारित करण्यात आली. शेतकऱ्याला वैयक्तिक कामासाठी शासकीय कार्यालय वापरण्याची परवानगी दिल्याबद्दल सुमारे 10 कनिष्ठ कर्मचाऱ्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

शहर पेट्रोल डीझल
कोल्हापूर 106.06 92.61
मुंबई 106.31 94.27
नागपूर 106.63 93.16
पुणे 106.42 92.92
View all
Currency Price Change
शहर पेट्रोल डीझल
कोल्हापूर 106.06 92.61
मुंबई 106.31 94.27
नागपूर 106.63 93.16
पुणे 106.42 92.92
View all
Currency Price Change