Kacha Badam | (Photo Credit: Archived, edited, representative images

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या काचा बादाम (Kacha Badam) गाण्याचे गायक भुबन बड्याकर (Bhuban Badyakar) यांचा अपघात झाला आहे. या अपघातात ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांना वीरभूमी येथील सुपर स्पेशियलिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. सांगितले जात आहे की, भुबन बड्याकर हे एक सेकंड हँड कार चालवत होते. दरम्यान, त्यांच्या वाहनाचा अपघात झाला. ज्यात त्यांचे डोके आणि छातीवर गंभीर जखमा झाल्या आहेत.

भुबन बड्याकर हे पश्चिम बंगाल येथील बीरभूम जिल्ह्यातील कुरालजुरी गावाचे रहिवासी आहेत. त्यांच्या कुटुंबात पत्नी, दोन मुले आणि एक मुलगी आहे. भुबन हे भुईमुगाच्या शेंगा विकून आपला चरीतार्थ चालवतात. ग्रामिणभागात भुईमूग विकताना आपल्या 'काचा बादाम' गाण्याने ते ग्राहकांचे लक्ष वेधून घेतात. ते 'काचा बदाम' गाणे गात भुईमूग शेंगा विकताना कोणीतरी त्यांचा व्हिडिओ शुट केला आणि सोशल मीडियावर अपलोड केला. (हेही वाचा, Sex Offer: '...अशा प्रत्येक रशियन सैनिकासोबत मी सेक्स करेन'; OnlyFans मॉडेलची Russian Soldiers ना खास ऑफर)

ट्विट

 

View this post on Instagram

 

A post shared by SHUBHAM (@shubham0815__)

ट्विट

भुबन बड्याकर यांचे गाणे सोशल मीडियावर अपलोड होताच सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले. त्यांचे गाणे सोशल मीडियावर इतके व्हायरल झाले की, एका म्यूजिक कंपनीने चक्क त्यांना लाखो रुपये देऊन त्यांच्या गाण्याचा व्हिडिओ बनवला. तसेच, तो म्यूजिक व्हिडिओही रिलीज केला. त्यांना काही टीव्ही शो आणि प्रोग्रामच्या ऑफरही मिळू लागल्या. त्यांचे कचा बदाम गाणे इतके लोकप्रिय झाले आहे की, ते जिथे जाथील तेथे लोक त्यांच्यासोबत सेल्फी काढताना दिसत आहेत. त्यांच्या गाण्यामुळे ते आता सेलिब्रेटी बनले आहेत.