Sex Offer: '...अशा प्रत्येक रशियन सैनिकासोबत मी सेक्स करेन'; OnlyFans मॉडेलची Russian Soldiers ना खास ऑफर
Image Use For Symbolic Purposes Only | (Photo Credits: PixaBay)

रशिया आणि युक्रेनमध्ये अजूनही युद्ध (Russia Ukraine War) सुरू आहे. या युद्धामुळे जगातील इतर अनेक देशांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. सोशल मिडियावर अनेकांनी युक्रेनला पाठींबा दर्शवला असून, रशिया व पुतिन यांच्यावर टीका सुरु आहे. आता या युद्धासंबंधी एका ऑफरमुळे एक अडल्ट मॉडेल चर्चेत आली आहे. या मॉडेलने रशियन सैन्याला एक विचित्र ऑफर दिली आहे. ती म्हणते की, जे रशियन सैनिक राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्या शब्दांचे खंडन करतील, पुतिन यांचा आदेश जुमानणार नाहीत, अशा सर्व सैनिकांसोबत मी सेक्स (Sex) करेन.

ट्विटरवर बॅड किट्टी (Bad Kitty) नावाने प्रसिद्ध अडल्ट मॉडेल लिली समर्स (Lilly Summers) सध्या तिच्या एका विधानामुळे चर्चेत आहे. डेली स्टारच्या वृत्तानुसार, जेव्हापासून रशिया आणि युक्रेनमध्ये वाद सुरू झाला तेव्हापासून ती ट्विटरवर वादग्रस्त ट्विट पोस्ट करत आहे. ही मॉडेल युक्रेनच्या बाजूने असून, या युद्धात युक्रेनचा जय व्हावा म्हणून ती रशियन सैन्याला वेगवेगळ्या ऑफर्स देत आहे. नुकतेच रशियन लष्कराला देण्यात आलेल्या ऑफरमध्ये तिने म्हटले आहे की, जो रशियन सैनिक पुतिन यांचे शब्द पाळणार नाही, अशा प्रत्येक सैनिकासोबत मी सेक्स करेन.

काल म्हणजेच 27 फेब्रुवारीला तिने आणखी एक ट्विट केले आणि युक्रेनच्या सैनिकांसाठी खास ऑफर दिली. तिने लिहिले की, ‘जर 1 रशियन मरण पावला तर मी 1 न्यूड फोटो पाठवेन. जर 1 रशियन टँक नष्ट झाला तर मी 1 व्हिडिओ पोस्ट करेन आणि जर 1 विमान पाडले गेले तर मी सेक्स करेन.’ (हेही वाचा: Ukraine-Russia War: रशियाने आक्रमण केल्यानंतर 3,68,000 हून अधिक लोकांनी युक्रेनमधून केले पलायन)

दरम्यान, लिली ही एकमेव व्यक्ती नाही जी आपल्या ऑफर्सद्वारे रशियाविरूद्ध आवाज उठवत आहे. असे अनेक रेस्टॉरंट आणि बार आहेत जे रशियन व्होडका विकण्यास नकार देत आहेत. अनेकांनी आपल्या बारमध्ये रशियन व्होडकाऐवजी युक्रेनियन व्होडका विकण्यास सुरुवात केली आहे आणि त्यातून कमावलेले पैसे धर्मादाय संस्थेला दान केले जात आहेत.