Rajdeep Sardesai Apologize: प्रणब मुखर्जी यांच्याबाबत चुकीचे वृत्त दिल्याबद्दल पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी मागितली माफी
Rajdeep Sardesai | (Photo Credits: Facebook)

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी (Former President Pranab Mukherjee) यांच्याबद्दल अपूर्ण आणि चुकीच्या माहितीवर दिलेल्या वृत्ताबद्दल राष्ट्रपती पत्रकार राजदीप सरदेसाई (Journalist Rajdeep Sardesai) यांनी माफी मागितली आहे. त्यानंतर सोशल मीडियावर राजदीप सरदेसाई (Rajdeep Sardesai) यांना ट्रोल करण्यात येऊ लागले आहे. माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी (ranab Mukherjee) यांच्या निधनाबाबतचे एक खोटे वृत्त ट्विटरवर गुरुवारी येऊ लागले होते. मात्र, त्यानंतर काही वेळातच प्रणव मुखर्जी यांचे चिरंजीव अभिजीत मुखर्जी यांनी या वृत्ताचे खंडण केले.

या वेळी अभिजीत मुखर्जी यांनी प्रसारमाध्यमांवर निशाणा साधताना म्हटले की, 'भारतीय मीडिया फेक न्यूजचा एक कारखानाच आहे.' त्यानंतर राजदीप सरदेसाई यांनीही त्यानंतर एक ट्विट करुन प्रणव मुखर्जी यांच्या निधनाचे चुकीचे वृत्त ट्विट केल्याबद्दल माफी मागत असल्याचे ट्विट केले. सरदेसाई यांनी ट्विटमध्ये म्हटले की, मी एक वेळ वृत्ताची खात्री करुन घ्यायला हवी होती. या वृत्ताबद्दल मी माफी मागतो.

प्रणव मुखर्जी यांच्या कन्या शर्मिष्ठा मुखर्जी यांनीही ट्विट केले की, 'माझ्या वडिलांबाबत प्रसारमाध्यमांतून येऊ लागेलेल्या बातम्या चुकीच्या आहेत. मी सांगू इच्छिते की, प्रसारमाध्यमांनी आता मला फोन करु नये. जेणेकरुन रुग्णालयातून मला काही महत्त्वाची माहिती देण्यासाठी फोन येत असेल तर त्या वेळी माझा फोन बिजी राहु नये.' (हेही वाचा, Ramon Magsaysay Award 2019: पत्रकार रवीश कुमार यांना यंदाचा 'रॅमन मॅगसेसे' पुरस्कार; पत्रकारितेतील योगदानाबद्दल गौरव)

दरम्यान, माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची प्रकृती यांची प्रकृती अद्यापही गंभीर आहे. काही दिवसांपूर्वीच (10 ऑगस्ट) त्यांना दिल्ली येथील आर्मी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर ब्रेन सर्जरी करण्यात आली आहे. त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले की त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांना कृत्रिम श्वसन यंत्रणेवर ठेवण्यात आले आहे.