कोरोना व्हायरसच्या संकटाची भारतात चाहुल लागल्यानंतर लगेचच सरकार, आरोग्य विभागाकडून त्या संदर्भात जनजागृती सुरु करण्यात आली. तसंच या जनजागृती कार्यात अनेक सेलिब्रिटी, सेवाभावी संस्था, प्रसारमाध्यमे, क्रीडापटू यांसह अनेकांनी सहभाग घेतला. तर काही ठिकाणी सर्वसामान्य नागरिकांनीही कोरोना व्हायरस संबंधित माहिती लोकांपर्यंत पोहचवण्याचे विविध मार्ग अवलंबले. असा एक प्रयत्न झारखंड मधील काही कलाकारांनी केला आहे. झारखंड मधील रांची येथे कोरोना विषयी जनजागृती करणारे संदेश, चित्र कलाकारांनी रस्त्यावर साकारले आहेत. यातून नागरिकांनी घराबाहेर पडू नका. घरी सुरक्षित रहा असा संदेश देण्यात आला आहे. महर्षी सेवा आश्रमातील सुनील कुमार, जितेंद्र शर्मा, टिंकू, सूरज साहू, सस्ती सिंह, अंकित कुमार या कलाकारांनी रस्त्यावर ही कलाकृती साकारली आहे.
देशातील इतर राज्यांच्या तुलनेत झारखंड मध्ये एकूण 33 कोरोना बाधित रुग्ण आहेत. तर 2 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मात्र राज्यात अद्याप एकही रुग्ण बरा झालेला नाही. दरम्यान पुढील धोका टाळण्यासाठी नागरिकांना सुरक्षित राहण्याचा संदेश कलाकारांनी या कलाकृतीतून दिला आहे. (Coronavirus संदर्भात जागरुकता निर्माण करण्यासाठी तरुणाचा हटके प्रयत्न; कोरोनाच्या डिझाईनचे हेल्मेट घालून लोकांना दिला घरी सुरक्षित राहण्याचा सल्ला)
ANI Tweet:
Jharkhand: A group of artists painted messages & graffiti on the streets of Ranchi to spread awareness on #Coronavirus. (17.4.2020) pic.twitter.com/FcQwql3ylr
— ANI (@ANI) April 17, 2020
यापूर्वी अनेक कलाकारांनी विविध माध्यमातून सुरक्षित राहण्याचा सल्ला दिला होता. चेन्नई, उत्तर प्रदेश येथे कोरोना हेल्मेट घालून काही तरुणांनी नागरिकांना सुरक्षित राहण्याचा सल्ला दिला होता. तर आंध्रप्रदेशात घोड्यांना कोरोना प्रमाणे रंगवत पोलिसांनी नागरिकांना जागरुक केले होते. ओडिसा येथे सायकल रॅली काढून पोलिसांनी सुरक्षिततेचा संदेश दिला होता.