गर्लफ्रेंडला प्रपोज करण्यासाठी त्याने केला 6 महिने प्रवास; Google Earth च्या माध्यमातून केले हटके स्टाईलने प्रपोज (Viral Video)
Man spells Marry me on Google Earth (Photo Credits: YouTube grab)

प्रपोज करण्यासाठी मुलं काय शक्कल लढवतील सांगता येत नाही. आता एका जपानी मुलाने एका अनोख्या पद्धतीने आपल्या गर्लफ्रेंडला प्रपोज केले आहे. टोकियोत राहणाऱ्या एका मुलाने 6 महिने प्रवास करुन गुगल अर्थ (Google Earth) जीपीएस (GPS) द्वारे गर्लफ्रेंडला हटके स्टाईलने प्रपोज केले आहे. सर्वात मोठ्या जीपीएस ड्रायव्हिंगसाठी (GPS Drawing) त्याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये (Guinness World Records) करण्यात आली आहे. . यासुशी 'यासन' ताकाहाशी (Yasushi “Yassan” Takahashi) यांची ही स्पेशल गोष्ट खुद्द गुगलने ट्विट करुन सांगितली आहे.

गुगलचे ट्विट:

2008 मध्ये टोकियोत राहणारा यासन याला आपली गर्लफ्रेंड नात्सुकी (Natsuki) हिला प्रपोज करायचे होते. यासाठी ते खास शक्कल लढवली. गेल्या 10 वर्षांपासून तो Google Earth आणि GPS द्वारे ड्रायव्हिंग बनवत होता आणि याचाच वापर त्याने प्रपोज करण्यासाठी करायचा असे ठरवले.

जीपीएस आर्ट ही एक कला असून जेव्हा एखादा मार्ग गुगल अर्थ यांसारख्या मॅपिंग टूलवर अपलोड केल्यानंतर एक विशिष्ट आकार घेतो. त्यावर मोठ्या अक्षरात त्याने मॅरी मी असे लिहिले. हे सुंदर शब्द जपानच्या संपूर्ण नकाशावर पसरले आहेत.

पहा व्हिडिओ:

आपले अनोखे स्वप्न साकारण्यासाठी यासनने नोकरी सोडली आणि होक्काइडो द्वीप (Hokkaido Island)ते कागोशिमा तटापर्यंतच्या (shores of Kagoshima)प्रवासाची योजना आखली. सहा महिने प्रवास केल्यानंतर प्रपोजल संपवण्यासाठी त्याने 7000 किलोमीटरचा प्रवास केला आणि ड्रायव्हिंग पूर्ण केले. यासनचे या हटके प्रपोजलमुळे नात्सुकी देखील भारावून गेली आणि तिने प्रपोजलचा स्वीकार केला.

साऊथ चायना मार्निंग पोस्ट ला दिलेल्या मुलाखतीत तिने सांगितले की, मी जगातील सर्वोकृष्ट प्रेमाचा अनुभव घेत आहे. यासनचा हा प्रवास गुगलने व्हिडिओ ट्विट करत संपूर्ण जगाला दाखवून दिला आहे.

यासनच्या या हटके प्रपोजल व्हिडिओला 17000 हून अधिक व्हूज मिळाले आहेत. तर हजाराहून अधिक कमेंट्स मिळाले आहेत.