New Year 2021 Babies! 1 जानेवारी रोजी जन्मणाऱ्या बाळांच्या संख्येमध्ये चीन ला मागे टाकत भारत प्रथमस्थानी
Babies (Photo Credits: Pixabay)

नववर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच 1 जानेवारी 2021 रोजी जगभरात सुमारे 3,71,504 बाळं जन्माला येतील असा अंदाज होता. त्यापैकी 60,000 बाळं केवळ भारतात जन्म घेतली असे UN Children's Fund (Unicef) ने म्हटले होते. 2021 या वर्षात तब्बल 14 कोटी बाळं जन्माला येतील, असा अंदाज आहे. तसंच या सर्व बाळांचे सरासरी वय 84 वर्षांपर्यंत असेल. पॅसिफिक (Pacific )मधील फिजी (Fiji) मध्ये 2021 च्या पहिल्या बाळाचा जन्म होईल. तर अमेरिकेत सर्वात शेवटच्या बाळाचा जन्म होईल, असा अंदाज आहे.

संपूर्ण जगभरामध्ये 1 जानेवारी रोजी जन्म घेणाऱ्या मुलांच्या संख्यापैकी निम्म्याहून अधिक मुलं केवळ 10 देशांत जन्म घेतील. यामध्ये भारत (59,995), चीन (35,615), नायजेरिया (21,439),पाकिस्तान (14,161), इंडोनेशिया (12,336), इथिओपिया (12,006), अमेरिका (10,312), इजिप्त (9,455), बांग्लादेश (9,236) असे युनीसेफचे म्हणणे आहे.

आज जन्म घेणाऱ्या मुलांसाठी जगातील वातावरण हे आधीच्या वर्षापेक्षा खूपच उत्तम आहे. नवीन वर्ष नव्या उमेदी आणि नव्या संधी घेऊन येईल. आपण जे जग बनवू त्या जगाचे ही येणारी पीढी संवर्धन करेल. 2021 हे वर्ष मुलांसाठी अधिक सुरक्षित, आरोग्यदायी आणि समान संधीचे बनवू, असे युनीसेफचे कार्यकारी संचालक हेनरीटा फोर यांनी म्हटले.

भारतामध्ये आज जन्मणाऱ्या बाळांचे वय 80.9 वर्ष असेल असे युनीसेफचे म्हणणे आहे. India Newborn Action Plan 2014-2020 या प्लॅनमध्ये देशाने घेतलेल्या प्रयत्नांमुळे प्रत्येक दिवशी हजार अधिक बाळांना जीवनदान मिळाले आहे. कोरोना संकटामुळे झालेल्या नुकसानाची मोजणी करुन त्यावर योग्य ती उपाययोजना केल्यास येणाऱ्या बाळांसाठी हे जग अधिक सुरक्षित असेल. आपण हे सर्व करताना दीर्घकालीन विचार करणे गरजेचे आहे. त्यामुळे अशी परिस्थिती पुन्हा ओढावणार नाही, अशी माहिती युनिसेफ इंडियाचे रिप्रेजेन्टेटीव्ह यास्मीन अली हक यांनी दिली.