Railway Worker Beats Handicapped Man: ग्वाल्हेरमध्ये रेल्वे स्थानकावर कर्मचाऱ्याकडून अपंग व्यक्तीला बेदम मारहाण, Watch Viral Video
Railway Worker Beats Handicapped Man (PC -X/@SushilKaushikMP)

Railway Worker Beats Handicapped Man: मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर (Gwalior) जिल्ह्यातून एक व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होत आहे. या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती एका दिव्यांग व्यक्तीला रेल्वे स्थानकारवर बेदम मारहाण करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये रेल्वे कर्मचारी अपंग व्यक्तीच्या अंगाभोवती गुंडाळलेली चादरही ओढताना दिसत आहे. विशेष म्हणजे यावेळी स्थानकातील एकही व्यक्ती हे कृत्य थांबवण्यासाठी पुढे आली नाही. तेथील उपस्थित सर्वजण केवळ हा प्रकार पाहत होते.

प्राप्त माहितीनुसार, हा व्हिडिओ 20 फेब्रुवारीचा आहे. ग्वाल्हेर स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 4 वर ही घटना घडली. रेल्वेच्या एका कर्मचाऱ्याला वाटले की, कोणीतरी ट्रेनमधून बेडशीट चोरत आहे. दरम्यान त्याची नजर एका अपंग व्यक्तीवर पडली. त्याने रेल्वेतून पांढरी चादर चोरल्याचे समजून दिव्यांग व्यक्तीला बेदम मारहाण केली. (हेही वाचा - Mother Beating Son: शिस्त लावण्यासाठी आईने मुलाला केली बेल्टने बेदम मारहाण, व्हिडीओ व्हायरल)

पहा व्हिडिओ -

ही व्यक्ती दिव्यांग व्यक्तीला कोणतेही प्रश्न न विचारता मारहाण करताना व्हिडिओमध्ये दिसत आहे. सर्वप्रथम या व्यक्तीने दिव्यांग व्यक्तीला प्लॅटफॉर्मवर ओढलं. नंतर ही व्यक्ती त्याच्या छातीवर पाय ठेवून उभी राहते. त्याचे दोन्ही हात ओढते. तसेच दिव्यांग व्यक्तीचं बेडशीटही या कर्मचाऱ्याने ओढलं. त्यामुळे त्यांचे अपंगत्व दिसून आले. मारहाण करणाऱ्या व्यक्तीपासून सुटण्याचा त्यांनी आटोकाट प्रयत्न केला. पण, त्याला तिथून हलता येत नव्हते. मारहाणीच्या या क्रृर कृत्यावेळी स्टेशनवर मोठी गर्दी होती. मात्र पीडित व्यक्तीला वाचवण्यासाठी कोणीही पुढे आले नाही.