Elephant Viral Video (Photo Credits: Twitter)

लहानपणी एकीचे बळ ही गोष्ट आपल्यापैकी अनेकांनी ऐकली असेल. मात्र याच गोष्टीची प्रचिती आलीय ती हत्तींच्या कळपाच्या (Elephant) व्हायरल झालेल्या व्हिडिओवरुन (Viral Video)... प्राणी माणसांवर जितके प्रेम करतात तितकेच माणसांकडून आपल्याला हानी पोहचू शकते हे लक्षात येतात एकत्र येऊन लढू शकतात हे या व्हिडिओवरुन दिसून येते. या व्हिडिओमध्ये बरेच हत्ती एकत्र येऊन आपल्या क्षेत्रात शिरणा-या माणसांना पळवून लावताना दिसत आहे. हा व्हिडिओ भारतीय वनसेवाचे अधिकारी सुशांत नंदा यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. या व्हिडिओखाली त्यांनी माहितीपूर्ण संदेश देखील दिला आहे.

'जेव्हा हत्तींना निळा रंग जाणवतो, तेव्हा ते एकत्र येऊन आपली सोंड वर करून सहानुभूति आवाज करतात.हत्तीच्या पिल्लांना घेरणा-या तणावग्रस्त झुंडाला पाहा. ते अभेद्य आहे. एक-दुस-याला धडाला स्पर्श करुन, आपल्या आईला विश्वास देतात की आम्ही या चांगल्या गोष्टी शिकतो.' असे त्यांनी या पोस्टखाली म्हटले आहे.हेदेखील वाचा- Dolphin in Vashi Creek: वाशी च्या खाडीमध्ये नागरिकांनी झाले डॉल्फिनचे दर्शन, व्हायरल व्हिडिओच्या माध्यमातून पाहा हा अद्भूत नजारा, Watch Video

हा व्हिडिओ शेअर केल्यानंतर काही तासांतच या व्हिडिओला 12.6 हून अधिक व्ह्यूज मिळाले तर 973 लाइक्स मिळाले. हा व्हिडिओ 36 सेकंदाचा या व्हिडिओमध्ये हत्तींची झुंड आपल्या सोंडेने आवाज करत जोरात पळत आहे आणि त्यांच्या भागात घुसणा-या लोकांना पळवून लावत आहेत.

हत्तींच्या क्षेत्रात अतिक्रमणाचे काही व्हिडिओ याआधीही समोर आले आहेत. काही दिवसांपूर्वी एका व्हिडिओत हत्तीचे पिल्लू आपल्या हद्दीत घुसणा-या व्यक्तीला हाकलत असतानाचा व्हिडिओ समोर आला होता.