गर्लफ्रेंड च्या लग्नात साडी नेसून, मेकअप करुन 'तो' पोहचला खरा पण, नातेवाईकांनी ओळखलचं त्या नंतर काय घडले ते तुम्हीच पाहा (Watch Viral Video)
Photo Credit: Twitter

प्रेमाच्या सर्व मर्यादा ओलांडणारे लोक केवळ चित्रपटांमध्येच नसून वास्तवातही असतात. भदोहीहून येत असलेला व्हिडिओ पाहून तुम्हीही विचार कराल की प्रेमामुळे माणसाला काय-काय करावे लागते. गर्लफ्रेंडला (Girlfriend) भेटण्यासाठी अनेक शक्कल लढवल्या जातात. तिला भेटण्यासाठी काहीही करण्याची तयारी असते. मात्र, अनेकदा या प्रकारांमुळे मुलांना अडचणींचा सामना करावा लागतो. अशाच प्रसंगाचे उदाहरण देणारा प्रकार यूपी मध्ये एका लग्नसोहळ्यात घडला आहे.  हे ही वाचा (Viral Video: कॅरम खेळताना दोन म्हाता-यांमध्ये झाले लहान मुलांसारखे भांडण, पुढे झाले असे काही पाहून तुम्हाला होईल हसू अनावर )

एक तरुण त्याच्या प्रेयसीला भेटण्यासाठी चक्क साडी नेसून गेला.साडी नेसल्यामुळे आणि डोक्यावरून पदर तोंडापर्यंत असल्यामुळे त्याला कोणीही ओळखलं नाही. बाहेर लोकांना कोणीतरी महिला असल्याचं समजून त्यांनी त्याला घरात जाण्यापासून रोखलं नाही. मात्र, घरात गेल्यानंतर महिलांसमोर मात्र त्याची चांगलीच अडचण झाली.जेव्हा नातेवाईकांनी त्याला पकडले तेव्हा काय घडले ते तुम्ही स्वतः पाहा.

उपस्थित महिलांनी जेव्हा त्या महिलाच्या वेशातील मुलाशी बोलण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याने स्त्रीयांच्या आवाजात बोलण्याचा प्रयत्न केला आणि तेव्हा इतर महिलांना शंका आली. त्या नंतर महिलांनी त्याला तोंडावरील पदर बाजूला घेण्यास सांगितला. मात्र, तो पदर बाजूला घेण्यास तयार नव्हता. त्यामुळं महिलांचा संशय आणखीनच वाढला आणि त्यांनी घराबाहेर असलेल्या पुरुष मंडळींना बोलवले . नंतर त्या मुलाने सगळ्यांची माफी मागितली मात्र तिथल्या ऐकाने है सर्व प्रकार त्याच्या मोबाईल मध्ये शूट करुन घेतला आणि सध्या  सोड=सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.हा सर्व प्रकार उत्तर प्रदेशमधील भदोहीच्या सोनखरी गावातील आहे.