Viral Video: कॅरम खेळताना दोन म्हाता-यांमध्ये झाले लहान मुलांसारखे भांडण, पुढे झाले असे काही पाहून तुम्हाला होईल हसू अनावर
Senior Citizens Fights Video (Photo Credits: Twitter)

असं म्हणतात म्हातारपण हे दुसरं बालपण असतं. अभी तो मैं जवान हूँ अनेक म्हातारी माणसं आपली हौस पूर्ण करताना दिसतात. मग ते खेळणं असो, गाण असो, डान्स करणे असो. आपल्या बालपणीच्या मित्रांसोबत गेट टुगेदर करत ते धमालमस्ती करतात. असाच एका म्हाता-यांचा व्हिडिओ सध्या व्हायरल (Viral Video) होत आहे. या व्हिडिओमध्ये दोन म्हातारे कॅरम खेळताना एकमेकांसोबत लहान मुलांसारखे भांडत आहेत. यांचे भांडण पाहून ही म्हातारी खरंच लहान झाली आहेत असे एका क्षणी तुम्हाला वाटेल.

या व्हिडिओला @Shobhana111 ट्विटर यूजरने शेअर केले आहे. हा व्हिडिओ सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. मुख्य म्हणजे हे दोन्ही म्हातारी माणसे कॅरम खेळताना एकमेकांसोबत मजेशीर मारामारी करताना दिसत आहे. त्यानंतर पुढे काय झाले हे तुम्हीच पाहा

हेदेखील वाचा- Viral Video: फना पसरवून माकडाला डसण्यासाठी जात होता किंग कोब्रा, सापाची झाली अशी दशा की व्हिडिओ पाहुन तुम्ही ही व्हाल स्तब्ध 

एकमेकांना मारत असताना एकाच्या हातातील घड्याळ तुटले. आपल्या दुस-या मित्राने कॅरमच्या सोंगट्या हातात लपविल्याने नाराज होऊन त्यांच्यात मारामारी होते. त्यादरम्यान मारत असलेल्या आजोबांचे घड्याळ तुटते. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही हसून हसून लोटपोट झाल्याशिवाय राहणार नाही. या व्हिडिओला 15.1K व्ह्यूज मिळाले आहेत. तर 464 लोकांनी हा व्हिडिओ रिट्विट केला आहे.