Happy New Year 2019 Google Doodle : 2019 च्या पहिल्या दिवशी गुगलने डुडल साकारत केलं नववर्षाचं स्वागत!
Happy New Year 2019 Google doodle (Photo Credit: Google)

Happy New Year 2019 Google Doodle : नवीन वर्षात आपण सर्वांनी पर्दापण केलं आहे. काल नववर्षाच्या पूर्वसंध्येला जल्लोष करत सर्वांनी धुमधडाक्यात 2019 चे स्वागत केले असेल. जगभरात नववर्षाचा असलेला उत्साह गुगलनेही खास डुडल साकारत साजरा केला आहे. 2019 च्या स्वागतासाठी गुगलही सजलं आहे. 2019 च्या पहिल्या दिवशी साकारण्यात आलेल्या या गुगल डुडलमध्ये दोन छोटे हत्ती दिसत आहेत. सेलिब्रेशनसाठी रंगीबेरंगी फुगे दिसत आहेत. घडाळ्यात बाराचा ठोका पडला आहे आणि 2019 लिहिलेले हे डुडल आनंदाने झळकत आहे.

काल नववर्षाच्या पूर्वसंध्येचे गुगल डुडल साकारण्यात आलं होतं. सणवार, विशेष दिवस, एखाद्या व्यक्तीला मानवंदना म्हणून गुगल अनेकदा डुडल साकारत असतं. आता नववर्षाचा आनंद या गुगल डुडलमध्ये दिसत आहे.

(Video Credit: Youtube)

काल जगभरात नववर्षाचे स्वागत अगदी जल्लोषात आणि आनंदाने झाले असेल. प्रत्येक ठिकाणी नववर्षाची सुरुवात वेगवेगळ्या वेळी होत असली तरी नववर्षाचा आनंद खास असतोच. जुनं सगळं दूर सारुन नववर्षात नवीन जोमाने, उत्साहाने स्वागत केलं जातं आणि नववर्ष सुरेखच जाईल, अशी आशा प्रत्येकाच्या मनी असते.