विजेच्या खंबावर अडकलेले एक कबूतर (Pigeon) वाचविण्यासाठी गेलेल्या एका व्यक्तीचा विद्युत धक्का बसून मृत्यू झाला आहे. दिलीपभाई वाघोला असे या व्यक्तीचे नाव आहे. ही घटना गुजरात (Gujarat) राज्यातील अरावली जिल्ह्यातील मालपूर गावात घडली. विजेच्या खांबावर एक कबूतर अडकले होते. हे कबुतर एका 35 वर्षीय वक्तीच्या दृष्टीस पडले. पुढे हा व्यक्ती कबुतराला वाचविण्यासाठी विजेच्या खांबावर चडला. दरम्यान, या व्यक्तीला विजेचा धक्का बसला. या घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. स्थानिक पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे.
गुजारत येथील अरावली जिल्ह्यातील व्यास तहसील येथील मालपूर गावातील बाजारपेठेच्या ठिकाणी गुरुवारी दुपारी एक कबूतर विजेच्या खांबवर अडकले होते. हे कबुतर तडफडत होते. त्याला कोणाच्या तरी मदतीची गरज होती. कबुतराला वाचविण्यासाठी नागरिक लांब काठीने प्रयत्न करत होते. परंतू, त्याला यश येत नव्हते. दिलीपभाई वाघोला (वय 35 वर्षे) नावाच्या एका व्यक्तीने या कबुतराला पाहिले. त्याला वाचविण्यासाठी ते विजेच्या खांबावर चडले. त्यांनी एक काठी हातात घेतली. दुर्दैव असे की ही काठी एका लोखंडी काठीला पुढे एक छोटी लाकडी काठी जोडलेली होती. दिलीपभाई यांनी जसेही कबुतराला काठीने धक्का दिला त्याच वेळी त्यांच्या हातातील काठी विजेच्या तारेला लागली. दिलीपभाई यांना विजेचा धक्का बसला. (हेही वाचा, कल्याण: कबूतराच्या जीवाशी क्रूरतेने खेळणाऱ्या महिलेविरोधात गुन्हा दाखल)
दिलीपभाई वाघेला हे तीन मुलांचे वडील आहेत. ते मजुरी करुन आपले कुटुंब चालवतात. उपस्थितांनी प्रयत्न करुन दिलीप वाघेला यांना तातडीने खाली खेचण्याचा प्रयत्न केला. परंतू, त्यांचे डोके जमीनवर जोरात आपटले. त्यानंतर काही क्षणातच दिलीप यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, मुले आणि कुटुंबीय आहेत. नागरिकांनी या घटनेचा व्हिडिओ मोबाईलद्वारे चित्रित केला आणि सोशल मीडियावर व्हायरल केला.