गुजरातमध्ये मागील काही दिवसांपासून कोसळणार्या मुसळधार पावसामुळे वडोदरा शहराला पूराचा फटका बसला आहे. नागरिकांच्या घरात पाणी घुसल्याने जनजीवन विस्कळीत झालं आहे. या पुरात अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी NDRF च्या पथकाची मदत घेतली आहे. यामध्ये एका 45 दिवसाच्या चिमुकल्याला पोलिस अधिकार्याने सुरक्षितपणे बाहेर काढले. वासुदेवाने पूरातून जसे बाळ कृष्णाला डोक्यावर घेऊन सुरक्षितपणे नदी पार केली. त्याप्रमाणेच हा पोलिस अधिकारी चिमुकल्यसाठी आधुनिक काळातील वासुदेव ठरल्याची भावना व्यक्त करण्यात आली आहे. सोशल मीडीयामध्ये याचं कौतुक होतं आहे. सोबतच या प्रसंगाचा व्हिडिओदेखील व्हायरल होत आहे.
चिमुकल्याची सुखरूप सुटका करणार्या पोलिस अधिकार्याचं नाव जी. के चावडा असे आहे. त्यांनी भर पावसामध्ये गळ्यापर्यंत साचलेल्या पाण्यातून सुरक्षितपणे बाळाला बाहेर काढले. यादरम्यान त्याने बाळाला एका टबमध्ये ठेवून त्याला डोक्यावर घेतले होते. दोरीच्या सहाय्याने पुढे जात जात त्याने साचलेल्या पाण्यातून रस्स्ता काढला. नदीत अचानक तरंगायला लागली इमारत, बघ्यांच्या भुवया उंचावल्या (Watch Video)
IPS ऑफिसरचं भेट
Video clip of rescue operation of baby of 45 days by cop Govind Chavda pic.twitter.com/vOgj3Fe6lv
— Dr. Shamsher Singh IPS (@Shamsher_IPS) August 1, 2019
वडोदरातील विश्वामित्री रेल्वे स्टेशनजवळील देवपुरा परिसरात 70 कुटुंब पुराच्या पाण्यात अडकले होती. रावपुरा पोलीस स्टेशनमधील कर्मचारी लोकांना वाचविण्यासाठी याठिकाणी पोहचले. त्यावेळेस टिपण्यात आलेला व्हिडिओ आता सर्वत्र व्हायरल झाला आहे.