नदीत अचानक तरंगायला लागली इमारत, बघ्यांच्या भुवया उंचावल्या (Watch Video)
नदीवर तरंगणारे हॉटेल (फोटो सौजन्य-ट्वीटर)

सध्या सोशल मीडियात दिवसेंदिवस काही ना काही गोष्ट व्हायर होत असते. यामुळेच युजर्स जास्त करुन सोशल मीडियात सक्रिय दिसून येतात. काही वेळेस एखादा व्हिडिओ किंवा फोटो पाहून लोक थक्क होतात. अशाच पद्धतीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियात प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून तुमच्या भुवया उंचावल्या जातील हे नक्की.

चीन (China) येथील यैंगजी ((Yangtze) नदी येथे पाच मजली एक इमारत नदीत अचानक तरंगत असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. परंतु व्हिडिओ प्रथम पाहिल्यास असे वाटते की, पुरामध्ये इमारत बुडाली आहे. पण नीट लक्ष देऊन बघितले असता असे समजते की, ही इमारत एक हॉटेल असून ते पाण्यावर तरंगत आहे.(मद्यधुंद तरुणाचा प्रताप! नशेत चक्क एका पोलीस अधिकाऱ्याचाच घेतला Kiss Watch Video)

सोशल मीडियात हा व्हिडिओ एका युजर्सने ट्वीटरवर पोस्ट केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार या हॉटेलचे नाव इम्प्रेशन जियान्गजिन (Jiangjin) असे आहे. खरतर हे पाण्यावर तरंगणारे हॉटेल असल्याचे बोलले जात आहे. यापूर्वीसुद्धा चीन मधील अशाच पद्धतीचे व्हिडिओ समोर आले होते. मात्र या व्हिडिओच्या सत्यतेची पुष्टी आम्ही करत नाही.