हैदराबाद : दारूच्या नशेत कधी कोणी काय करेल याचा अंदाज लावणे म्हणजे अशक्यच! अलीकडेच तेलंगणा (Telangana) मध्ये बोनालू फेस्टिवल (Bonalu Festival) दरम्यान एका ऑन ड्युटी पोलीस अधिकाऱ्याला एका दारुड्या 28 वर्षीय तरुणाच्या गैरवर्तणुकीचा प्रत्यय आला. दारूच्या नशेत भर रस्त्यात नाचत असलेल्या या तरुणाने चक्क या पोलीस अधिकाऱ्याला थांबवून सर्वांसमोर त्याचे चुंबन घेतले. ज्यानंतर या अधिकाऱ्याने या मद्यपी तरुणाच्या कानशिलात बजावली पण दारूच्या अधीन झालेला तरुण तरीही रस्त्यात धिंगाणा करत नाचत होता. यावेळेस डान्स रेकॉर्ड करत असणाऱ्या एका व्यक्तीच्या मोबाईलमध्ये हा संपूर्ण प्रकार रेकॉर्ड झाला आणि अल्पावधीतच हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
प्राप्त माहितीनुसार, ही घटना रविवारी (28 जुलै) रात्री बोनालू उत्सवाच्या दरम्यान घडली आहे. लोक रस्त्यावर डान्स करताना दिसत आहे. ड्युटीवर असलेला पोलीस अधिकारी तेथून जात असतो. पोलीस अधिकाऱ्याला पकडून तरूण चुंबन घेत असल्याचे स्पष्ट व्हिडीओत दिसत आहे. पोलिसाने तात्काळ त्याला धक्का देत कानशिलात लगावल्याचेही दिसत आहे. पुणे: मुलांची हत्या आणि आईची आत्महत्या प्रकरणात नवा खुलासा! वडिलांकडूनच दोन्ही चिमुरडींवर बलात्कार
पहा व्हायरल व्हिडीओ
Good evening.. pic.twitter.com/jTXrzScEH1
— Tik Tok Tik Tok (@0__1) July 29, 2019
दरम्यान याप्रकरणी नल्लाकुंता पोलिस स्टेशनचे निरीक्षक के. मुरलीधर यांनी सांगितल्यानुसार २८ वर्षीय तरूणाला अटक केली आहे तसेच त्याच्यावर आयपीसी 353नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित तरुण एका खासगी बँकमध्ये काम करतो.