सध्याच्या काळात लग्नसोहळा हा प्रत्येकाच्या इब्रतीचा प्रश्न झालाय. तो जितका चांगला, जितक्या दिमाखात रंगवता येईल तितक्या पद्धतीने रंगवण्यासाठी प्रत्येक लोक प्रयत्न करत असताता. किंबहुना त्यासाठी वाट्टेल तितका खर्च करण्याची त्यांची तयारी असते. प्रचंड पैसा ओतून त्यासाठी थोड्या हटके स्टाईलने लग्न करणे असेच त्यामागचे उद्देश असते. असच हटके स्टाईलने झालेले लग्न सध्या सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. जेथे नवरदेवाची एन्ट्री चक्क हवेतून झाली आहे.
मेक्सिकोमधील एका नवरदेवाने लग्नाच्या मंडपात चक्क पॅराशूट लावून आकाशातून मंडपात अवतरला. आकश यादव आणि गगनप्रीत सिंह या कपलचं मेक्सिकोमध्ये लग्न होतं. यात आकाश एअरक्राफ्टने ड्राइव्ह करत लग्नात पोहोचला.
पाहा व्हिडिओ:
हेदेखील वाचा- लग्न सोहळ्यासाठी कमी खर्च करणे सुद्धा बनते तणाव आणि घटस्फोटाचे कारण- रिपोर्ट
हे लग्न मेक्सिकोमधील Los Cabos मध्ये पार पडलं. या नवरदेवाचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत असून WedMeGood या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.
आकाशची लग्नात अशा प्रकारे एन्ट्री घेण्याची पूर्व तयारी नव्हती. त्याने एका वृत्तपत्राला सांगितले की, आधी तो मित्रांसोबत आणि परिवारासोबत बोटीने येणार होता. पण त्याला ऐनवेळी कायदेशीर कारणांमुळे तो असं करु शकत नाही. त्यामुळे त्याने एअरक्राफ्टने येण्याचा निर्णय घेतला