Google Doodle to Thanks all Teachers and Childcare Workers (Photo Credits: Google)

कोरोना व्हायरस (Coronavirus) जगभरात धुमाकूळ घालत असताना अनेक देश लॉकडाऊनमध्ये आहेत. कोरोना व्हायरसच्या गंभीर परिस्थितीत सारं जग अडकलं असताना जीवनावश्यक, अत्यावश्यक सेवा पुरवणारे डॉक्टर्स, पोलिसांसह सर्वच कर्मचारी जीवाची पर्वा न करता काम करत आहेत. तर काही लोक घरुन काम करुन आपले कर्तव्य बजावत आहेत. अशा सर्वांनाच धन्यवाद देण्यासाठी गुगलने खास डुडल्सची सिरीज सुरु केली आहे. त्यात प्रत्येक दिवशी विविध माध्यमातील कर्तव्यदक्ष मदतागारांचे आभार मानण्यात येत आहेत.

आज (17 एप्रिल) गुगलने ऑनलाईन माध्यमातून शिकवणारे टिचर्स (Teachers) आणि चाईल्ड वर्कर्सना (Childcare Workers) डुडलच्या माध्यमातून अभिवादन केले आहे. त्यासाठी त्यांनी लेटर E मधून ऑनलाईन टिचर साकारला आहे आणि तो लॅपटॉप समोर उभे राहून शिकवताना दिसत आहे. तर लेटर G मधून हार्ट फ्लो होत E पर्यंत जाताना आपल्याला या डुडलमध्ये पाहायला मिळत आहे.

यापूर्वी गुगलने विविध स्तरातील मदतगारांचे डुडलच्या माध्यमातून आभार मानले आहेत. डॉक्टर्स, नर्सेस, सफाई कामगार, डिलिव्हरी वर्कर्स, पोलिस इत्यादी मदतगारांना डूडलच्या माध्यमातून मानवंदना दिली आहे. गुगल अनेक खास प्रसंगात, सण-समारंभ, थोरामोठ्यांची जयंती-पुण्यतिथी निमित्त डूडल साकारुन त्या दिवसाचे महत्त्व अधोरेखित करत असतं. जागतिक आरोग्य संकटाच्या या कठीण काळातही गुगलने आपली परंपरा कायम राखली आहे. (कोराेना विषाणूशी लढणाऱ्या मदतगारांना धन्यवाद देण्यासाठी Google ने साकारलं Packaging, Shipping, and Delivery Workers साठी खास Doodle)

जगभराला हादरुन सोडणाऱ्या कोरोना व्हायरसची व्याप्ती भारत देशातही वाढत आहे. देशातील कोरोना बाधितांची संख्या 13000 च्या पार गेली आहे. तर आतापर्यंत 437 कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे. समाधानाची बाब  म्हणजे 1749 रुग्णांची प्रकृती सुधारली आहे.