Lucy Wills Birthday (Google)

Lucy Wills 131 Birth Anniversary:  मातृत्त्व हा स्त्रीला दुसरा जन्म देतो. जगभरातील गरोदर स्त्रियांमधील या काळात होणारे बदल आणि त्याचा बाळावर होणारा परिणाम याच्यावर उपाय म्हणून ल्युसी विल्स (Lucy Wills)च्या संशोधनातून नवसंजीवनी मिळाली आहे. Prenatal Anaemia ला रोखण्यासाठी म्हणजेच  गरोदरपणात गर्भातील काही दोष टाळण्यासाठी आवश्यक व्हिटॅमिनचा शोध ल्युसी विल्स यांच्या संशोधनच्या मदतीतून लागला आहे. आज (10 मे) दिवशी त्यांच्या 131 व्या वाढदिवसाचं औचित्य साधून खास गूगल डुडलच्या (Google Doodle) माध्यमातून आदरांजली अर्पण केली आहे.

फॉलिक अ‍ॅसिड हे शरीरात लाल रक्त पेशी निर्माण करण्यासाठी ठरतात. गरोदरपणाच्या सुरूवातीला आणि गरोदरपणाच्या काळात महिलांना फॉलिक अ‍ॅसिडची गरज असते. यामुळे गर्भाच्या मेंदू आणि स्पायनल कॉर्डमधील दोष टाळण्यास मदत होते. 1931 पर्यंत याबद्दक आरोग्यशास्त्रामध्ये याची माहिती नव्हती. मात्र विल्स यांनी भारतातील गरोदर स्त्रियांमधील अ‍ॅनिमिया या विषयावर जेव्हा संशोधन करून आपले विचार मांडले तेव्हा त्याची गरज लक्षात आली. शरीरातील रक्ताची कमतरता भरुन काढतील हे '4' पदार्थ!

लंडनमध्ये 1888 साली ल्युसीचा जन्म झाला. 1915 मध्ये तिने London School of Medicine for Women मध्ये प्रवेश मिळवला. 1920 पासून तिला मेडिकल प्रॅक्टिस करण्याची संधी मिळाली.मात्र तिने संशोधन करणं पसंत केले. यामधूनच ल्युसी 1928 साली मुंबईमध्ये आल्या. गरोदर स्त्रियांमध्ये अ‍ॅनिमिया आणि त्यांचा आहार यामध्ये ल्युसीने विशेष संशोधन केले.

ल्युसी यांचे संशोधन फॉलिक अ‍ॅसिडचा शोध लावण्यामागील पहिली पायरी समजली जाते. US Centers for Disease Control and Prevention ने सुद्धा आता गरोदर स्त्रियांना प्रतिदिन 400 मायक्रोग्रॅम्स फॉलिक अ‍ॅसिड ची आवश्यकता असल्याचं म्हटलं आहे.

ल्युसी यांचे वयाच्या 75 व्या वर्षी म्हणजे 1964 साली निधन झाले. ल्युसी स्वतः अविवाहित आणि निपुत्रित राहिल्या मात्र आरोग्यशास्त्रात त्यांच्या योगदानामुळे आता हजारो नवाजात बालकं सुदृढ स्वरूपात जन्म घेऊ शकतात.