Representational Image I (Photo Credit: Pixabay)

अॅनेमियाने भारतातील अनेक महिला पीडित आहेत. अॅनेमिया (Anemia) म्हणजे शरीरात रक्ताची कमतरता असणे. अनेकांना तर आपल्याला अॅनेमिया आहे, याची कल्पनाच नसते. सतत थकवा जाणवत असल्यास किंवा कामात मन लागत नसल्यास हा शरीरातील रक्ताच्या कमतरतेचा संकेत असू शकतो. त्यामुळे याकडे दुर्लक्ष करु नका. काही पदार्थांच्या सेवनाने तुम्ही शरीरातील रक्ताची कमतरता भरुन काढू शकता. (Dry Fruit खा, शरीरातील रक्ताचे कमी प्रमाण संतुलित राखा)

बीट

हिमोग्लोबिन आणि आयनची कमतरता भरुन काढण्यासाठी बीट हा सर्वोत्तम उपाय आहे. यात आयन, फोलिक अॅसिड, फायबर आणि पोटॅशियम असते.

सफरचंद

सामान्यपणे डॉक्टर रोज एक सफरचंद खाण्याचा सल्ला देतात. यात भरपूर प्रमाणात आयन असते त्यामुळे हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते. यामुळे पोटाच्या समस्याही दूर होतात.

डाळींब

डाळींबाच्या नियमित सेवनाने रक्ताची कमतरता भरुन निघते. डाळींबात आयन, कॅल्शियम, प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स आणि फायबर्स असतात. त्यामुळे शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढण्यास मदत होते.

आवळा

आवळ्यात व्हिटॉमिन सी मुबलक प्रमाणात असते. त्यामुळे शरीरातील रक्ताची कमतरता भरुन काढण्यासाठी आवळा फायदेशीर ठरतो.

(सूचना: वरील आर्टीकलचा उद्देश हा माहिती देणे हा आहे. यास वैद्यकीय सल्ला समजू नये. घरगुती/नैसर्गिक उपचार घेण्यापूर्वी डॉक्टरांच्या सल्ला घेणे आवश्यक आहे.)