अजस्त्र अजगराच्या विळख्यात अडकला, ताकदीनिशी प्रयत्न करुनही बाहेर पडणे झालं कठीण; पहा थरकाप उडवणारा व्हिडिओ
Snake | Photo Credits: Twitter/ @_Shaikirshad

अजस्त्र अजगरांच्या विळख्यात अडकलेला माणूस आणि त्यामधून सुटकेचा प्रयत्न हा प्र्कार अनेकदा सिनेमांमध्ये तुम्ही पाहिला असेल. पण सोशल मीडीयात वायरल होत असलेल्या एका व्हिडीओनुसार जा प्रसंग खर्‍याखुर्‍या आयुष्यात देखील घडला आहे. @_Shaikirshad ट्वीटर युजरने पोस्ट केलेल्या एका व्हिडिओनुसार हा प्रसंग 16 डिसेंबरचा आहे. यामध्ये महाकाय अजगाराने एका माणसाच्या पायाजवळ वेढा घातला आहे. आणि हा माणूस इतर काही लोकांच्या मदतीने त्याला सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण इतका शक्तीशाली आहे की तो दोघांनाही त्याला आवरणं कठीन झालं आहे. Snake Love Triangle: मादी वरून भिडलेल्या दोन अजस्त्र अजगरांच्या मस्तीमुळे ऑस्ट्रेलियात घरामध्ये कोसळले सिलिंग (See Pictures).

अजगराच्या विळख्यात माणूस

29 सेकंदाचा हा व्हिडिओ मनाचा थरकाप उडवणारा आहे. यामध्ये एक मनुष्य भल्यामोठ्या अजगारांच्या विळख्यामध्ये अडकला आहे. यामधून सुटण्याचा तो कसोशीने प्रयत्न करत आहे परंतू त्याचे हे प्रयत्न फोल ठरत आहेत. दरम्यान ट्वीटर वर अनेकांनी हा प्रसंग नेमका कुठे घडला आहे याची विचारपूस करत आहेत पण त्याची माहिती मिळालेली नाही.

ऑस्ट्रेलियामध्ये अशाप्रकारे घरात अनेकदा महाकाय साप, अजगर सापडल्याचं वृत्त समोर आलं आहे. घराच्या सिलिंगवरून साप पडून नुकसान झाल्याच्याही अनेक घटना समोर आलेल्या आहेत. दरम्यान साप, अजगर यासारख्या प्राण्यांसोबत योग्य नाही. घराजवळ, तुमच्या आजूबाजुच्या परिसरात अजगर, साप आढळल्यास घाबरून जाऊन त्याला मारहाण करणं टाळा आणि सर्पमित्र मंडळांशी संपर्क साधून सुरक्षितपणे त्यांनाबाहेर काढा.