ऑस्ट्रेलियामध्ये (Australia) एका घराच्या सिलिंग वर खेळणार्या दोन अजगरांच्या मस्तीमुळे काही भाग कोसळल्याची घटना समोर आहे. क्वीन्सलॅन्डमध्ये Laceys Creek परिसरात राहणार्या David Tait याच्या घरातील हा प्रसंग आहे. सोमवारी घरी परतल्यानंतर त्यांना डायलिंग टेबलवर सिलिंगचा एक भाग कोसळल्याचं चित्र दिसलं. डेविडला घरातच सुमारे 2.8 आणि 2.5 मीमी लांबीचे दोन अजगर वावरताना दिसले. त्यांचं वजन अंदाजे 22 किलो आहे. किचनमध्ये जमिनीवरूनच ते लिव्हिंग रूम आणि बेडरूममध्ये सरपटत जाताना दिसले. त्यानंतर त्याने स्ट्रिव्हन ब्राऊन या सर्पमित्राला बोलावून घरातून भलेमोठे साप बाहेर काढण्यासाठी त्याची मदत घेतली.
Brisbane North Snake Catchersने त्यांच्या फेसबूक पोस्टमध्ये हा प्रकार सांगितला आहे. सोबतच कोसळलेले सिलिंग आणि भलेमोठे अजगर यांचे फोटो देखील शेअर केले आहेत. त्यांच्यामध्ये हे साप Coastal Carpet Pythons आहेत. त्यांना Morelia spilota mcdowelli असं देखील म्हटलं जातं. स्टिव्हनने सांगितलेल्या माहितीनुसार, घराच्या सिलिंगद्वारा साप आले असतील याची त्याली माहिती नव्हती. तो पोहचला तेव्हा एक साप मुख्य दारापाशी तर दुसरा बेडरूमजवळ आढळला. पूर्वी या घराच्या जागेवर Laceys Creek State School होते.
ऑस्ट्रेलियात सिलींगमधून घरात पडला पायथन
स्टीव्हनच्या माहितीनुसार, एका मादी सापावरून या दोघांमध्ये झटापट झाली असू शकते. दरम्यान अजूनही मादी साप मिळालेला नाही. कदाचित ती सिलिंगमध्ये किंवा घरातच इतरत्र असू शकते. दोन्ही सापांना पुन्हा जंगलात सोडण्यात आले आहे. दरम्यान स्टीव्हनच्या आयुष्यात त्याने पाहिलेले हे दोन मोठे साप होते.