Gauri Shankar Bisen Viral Video (PC - Twitter)

BJP MLA Gauri Shankar Bisen: मध्य प्रदेशच्या माजी मंत्री गौरी शंकर बिसेन (BJP MLA Gauri Shankar Bisen) यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये गौरीशंकर बिसेन एका कार्यक्रमात शाळकरी मुलींना चुकीच्या पद्धतीने स्पर्श करताना आणि जबरदस्तीने फोटो काढताना दिसत आहेत. भाजपवर निशाणा साधत काँग्रेसने म्हटले की, माजी मंत्र्यांचे बेटी बचाओ अभियान बघा.

मध्य प्रदेशमध्ये माजी मंत्री गौरीशंकर बिसेन एका कार्यक्रमात मुलींसोबत जबरदस्तीने फोटो काढताना दिसत आहेत. ज्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. गौरीशंकर बिसेन मुलींना त्यांच्या संमतीशिवाय आपल्याकडे खेचत असल्याचे व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. वयोवृद्ध नेत्याच्या या कृत्याने मुली अस्वस्थ होताना दिसत आहेत. याप्रकरणी काँग्रेसने ट्विट केले की, "भाजप आमदार, माजी मंत्री आणि मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षा गौरी शंकर बिसेन मुलींसोबत लज्जास्पद कृत्य करत आहेत. भाजप नेत्यांपासून बेटी वाचवा." (हेही वाचा -Video: चालत्या रेल्वे मधून उतरतांना महिलेचा टोल गेला, पोलीस कर्मचाऱ्याने तत्परता दाखवून वाचवले प्राण)

माजी मंत्री गौरी शंकर बिसेन यांनी शाळकरी मुलींसोबत फोटो काढल्याने प्रकरण पेटले आहे. व्हिडीओ जारी करताना काँग्रेसने लिहिले की, ‘माजी मंत्र्याचे बेटी बचाओ अभियान पहा.’ याला प्रत्युत्तर म्हणून भाजपने लिहिलं आहे की, ‘काँग्रेस खराब राजकारण करत आहे’ असे भाजपने म्हटले आहे.’ भाजपचे प्रवक्ते नरेंद्र सलुजा यांनी काँग्रेसला आरसा दाखवत काँग्रेसची गरीब विचारसरणी दाखवून दिली.

माजी मंत्री गौरीशंकर बिसेन नेहमीचं वेगवेगळ्या वादामुले चर्चेत असतात. गेल्या मे महिन्यात बालाघाट जिल्ह्यातील बागेश्वर धामचे पं.धीरेंद्र शास्त्री यांच्या दोन दिवसीय दिव्य दरबाराचे आयोजन करण्यात आले होते. जिथे मागासवर्गीय कल्याण आयोगाचे अध्यक्ष गौरीशंकर बिसेन कथा ऐकण्यासाठी पोहोचले होते. यादरम्यान बाबाच्या रक्षकाने त्यांना धक्काबुक्की केली. ज्याचे व्हिडिओही समोर आले आहेत. याशिवाय बालाघाटमध्ये गौरीशंकर बिसेन यांनी आरटीओला शिवीगाळ केली होती.