FIFA World Cup 2022: प्रत्येक वेळी ब्राझीलने गोल केल्यावर शेअर करणार Topless Photo; मॉडेल Daiane Tomazoni ची घोषणा
Daiane Tomazoni (Photo Credit : Instagram)

कतारमध्ये फिफा विश्वचषक 2022 (FIFA World Cup 2022) सुरू असून, स्पर्धेत रोमांचक सामने सातत्याने पाहायला मिळत आहेत. आता राउंड-16 चे चित्र स्पष्ट होत आहे. आतापर्यंत अनेक मोठ्या संघांनी स्पर्धेत आपले स्थान पक्के केले आहे आणि त्यापैकी एक ब्राझील आहे. आता ब्राझीलबाबत एका मॉडेलने मोठी घोषणा केली आहे. या मॉडेलने घोषणा केली आहे की, फिफा विश्वचषक 2022 मध्ये ब्राझील संघाच्या प्रत्येक गोलवर ती एक टॉपलेस फोटो शेअर करेल.

अशाप्रकारे अर्धनग्न फोटो शेअर करण्याची घोषणा करणाऱ्या मॉडेलचे नाव डायने टोमाझोनी (Daiane Tomazoni) आहे. ब्राझीलची मॉडेल डायने टोमाझोनीने चाहत्यांना संघाच्या प्रत्येक गोलवर टॉपलेस फोटोचे वचन दिल्यानंतर ती सतत चर्चेत आहे. डायने टोमाझोनी म्हणाली की, ती तिच्या सुरक्षित फॉलोअर्ससाठी हे करेल. आता जेव्हा जेव्हा ब्राझील वर्ल्ड कपमध्ये गोल करेल तेव्हा तेव्हा ती तिच्या खास चाहत्यांसाठी अर्धनग्न फोटो पोस्ट करेल.

 

View this post on Instagram

 

A post shared by Daiane Tomazoni (@tomazonidaiane)

 

View this post on Instagram

 

A post shared by Daiane Tomazoni (@tomazonidaiane)

24 वर्षीय डायने टोमाझोनी इन्स्टाग्रामवर खूप लोकप्रिय आहे. ती तिचे हॉट फोटो पोस्ट करून चाहत्यांना वेड लावत असते. यंदाचा फिफा विश्वचषक ब्राझील जिंकू शकतो, असेही तिने म्हटले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ब्राझीलने शेवटचा सामना जिंकल्यानंतरही डायनेने टॉपलेस फोटो शेअर केला होता. (हेही वाचा: Pakistani Woman Dance Video on Marjani Song: पाकिस्तानी महिलेचा बॉलिवूड गाण्यावर डान्स, व्हिडिओ व्हायरल)

 

View this post on Instagram

 

A post shared by Daiane Tomazoni (@tomazonidaiane)

ब्राझील संघाने फिफा विश्वचषक 2022 च्या सुरुवातीचे दोन्ही सामने जिंकून राऊंड-16 मध्ये आपले स्थान आधीच पक्के केले आहे. ग्रुप जी मध्येही तो अव्वल आहे. फिफा विश्वचषक स्पर्धेतील सुरुवातीचे दोन्ही सामने जिंकणाऱ्या ब्राझील संघाची शुक्रवारी रात्री उशिरा जी गटातील शेवटची लढत कॅमेरूनशी होणार आहे.