Pakistani Woman Dance Video on Marjani Song: पाकिस्तानी महिलेचा बॉलिवूड गाण्यावर डान्स, व्हिडिओ व्हायरल
Pakistani Woman Dance (PC - Instagram)

पाकिस्तानी नागरिकांमध्ये (Pakistani Citizens Dance Indian Song) भारतीय आणि त्यातही बॉलिवूड गाण्यांवर डान्स करण्याची क्रेझ नेहमीच पाहायला मिळते. स्वर्गीय लता मंगेशकर ( Lata Mangeshkar) यांच्या 'मेरा दिल ये पुकारे' (Mera Dil Ye Pukare ) गाण्यावर डान्स करताना आयेशा (Ayesha Viral Video) नामक एका पाकिस्तानी महिलेचा (Pakistani Woman) व्हिडिओ नुकताच व्हायरल झाला होता. असाच आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत एक दोन महिला आणि एक पुरुष 'मरजानी' या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. यातील एक आयेशाच असल्याचे सांगितले जात आहे.

दोन महिला आणि एक पुरुष हे एका कार्यक्रमात डान्स करताना दिसत आहेत. पाकिस्तानमधील नेमक्या कोणत्या ठिकाणचा आणि कोणत्या कार्यक्रमातील हा व्हिडिओ आहे? याबाबत कोणतीही पुष्टी होऊ शकली नाही. मात्र, व्हिडिओत पाहायला मिळते की, छोट्या व्हिडिओमध्ये आयशा निळ्या रंगाचा एम्ब्रॉयडरी अनारकली सूट परिधान करताना दिसत आहे. ती इतर दोन लोकांसोबत स्टेजवर उभी आहे आणि बिल्लू ( Movie Billu) चित्रपटातील मरजानी (Marjani ) या गाण्यावर नाचत आहे. (हेही वाचा, Rishi Sunak Daughter Anoushka Performed Kuchipudi: ब्रिटनमधील कार्यक्रमात ऋषी सुनक यांची मुलगी अनुष्काने सादर केले 'कुचीपुडी' नृत्य, Watch Video)

व्हिडिओ

 

View this post on Instagram

 

A post shared by AYESHA (@oyee_ayesha)

सोशल मीडियावर हा व्हिडिओ काही तासांपूर्वीच शेअर करण्यात आला आहे. सोशल मीडियावर शेअर केल्यापासून या व्हिडिओला आतापर्यंत एक लाखाहून अधिक वेळा लाईक केले गेले आहे आणि अनेक कमेंट्स देखील मिळाल्या आहेत. एका इंस्टाग्राम युजरने लिहिले आहे की, "वाह. तुम्ही इंटरनेटवर छानपणे राज्य करत आहात." दुसर्‍या व्यक्तीने म्हटले, "तुमचे नृत्य अप्रतिम आहे." तिसरी व्यक्ती म्हणाली, "तुमच्या चाली अप्रतिम आहेत. खूप छान." इतर अनेक इंस्टाग्राम वापरकर्त्यांनी हार्ट इमोजी वापरून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.