Social Distancing Haldi Ceremony: कोविड-19 प्रादुर्भावात नवरीला हळद लावण्यासाठी कुटुंबियांनी केला चक्क Paint Roller चा वापर; पहा व्हायरल व्हिडिओ
Social Distancing Haldi Ceremony (Photo Credits: @payalbhayana/ Twitter)

कोरोना व्हायरस (Coronavirus) संकटामुळे आपल्या जीवनशैलीत लहान-मोठे बदल झाले आहेत. न्यू नॉर्मल (New Normal) चा स्वीकारुन केल्यानंतर आता हळूहळू ते आपल्या अंगवळणी पडू लागले आहे. त्यामुळे अनेक गोष्टींवर निर्बंध असूनही मनुष्याने त्यातून मार्ग काढत आपले जीवनमान सुरु ठेवले आहे. दरम्यान, कोरोना व्हायरस लॉकडाऊन काळात अनेकांनी घरगुती स्वरुपात लग्न, बारसं डोहाळे जेवण यांसारखे कार्यक्रम केले. तसंच आताही नियमांचे पालन करुन जमेल तसे लग्न, हळदी समारंभ पार पडत आहेत. असाच एक हळदी समारंभाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सोशल डिस्टसिंगच्या नियमांचे पालन करत नवरीच्या अंगाला हळद लावली जात असल्याचे या व्हिडिओत आपल्याला पाहायला मिळते.

या व्हिडिओत नवरीचे नातेवाईक आणि मित्रमंडळी नवरीला चक्क पेंट रोलरने (Paint Roller) हळद लावत आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांकडून यावर कमेंट्चा वर्षाव होत आहे. ट्विटर युजर पायल भयाना हिने हा व्हिडिओ शेअर केला आहे. यात नवरीच्या मैत्रिणीनी नवरीच्या हाता-पायाला पेंट रोलरने हळद लावताना दिसत आहेत. त्यावर सर्वजण हसत आहेत. 13 सेकंदाच्या या व्हिडिओला चांगलेच व्ह्युज मिळाले आहेत.

पहा व्हायरल व्हिडिओ:

लग्न हा मुलींच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा असतो. त्यामुळे त्यातील सर्व विधी, समारंभ यासाठी मुली उत्सुक असतात. म्हणून कोरोना व्हायरस संकटामुळे आयुष्यातील या महत्त्वाच्या घटनेवर पाणी फिरु नये आणि सर्व हौसमौज भागवता यावी, यासाठी हा एक भन्नाट उपाय नवरीच्या कुटुंबियांनी आणि मित्रपरीवाराने शोधून काढला आहे. (कोरोना व्हायरस लॉकडाऊनमध्ये सारं काही बंद असल्याने वैतागलेल्या 4 वर्षांच्या मुलीचा व्हिडिओ व्हायरल; नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा वर्षाव, Watch Video)

कोविड-19 लॉकडाऊन काळात असे अनोखे व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळाले. यावरुन आलेल्या संकटावर मात करण्याचा आणि त्यातून मार्ग काढण्याचा मानवी स्वभाव प्रकट होतो.