Little girl ranting (Photo Credits: Video Grab)

कोरोना व्हायरस (Coronavirus) दहशतीच्या पार्श्वभूमीवर जगभरातील अनेक देशांमध्ये लॉकडाऊनची (Lockdown) स्थिती आहे. तसंच New Normal सह अॅडजस्ट होणे सर्वांसाठी काहीसे कठीण जात आहे. त्यामुळे आपण सर्वजण आपलं पूर्वीचं आयुष्य मिस करत आहोत. शॉपिंग करणे, आवडत्या रेस्टोरन्ट मध्ये जेवायला जाणे, बाहेर मनसोक्त फिरणे या सगळ्यावर आता बंधनं आल्याने आयुष्य काहीसे रटाळ झाले आहे. गेल्या काही महिन्यांपासून सुरु असलेल्या लॉकडाऊनचा आता सर्वांनाच उबग आला आहे. एक 4 वर्षांची मुलगी देखील लॉकडाऊनमुळे अत्यंत फस्ट्रेट झाली आहे. तिचं फस्ट्रेशन ती बोलून व्यक्त करत आहे. तिच्या या वैतागण्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 2 दिवसांत हा व्हिडिओ तब्बल 6 मिलियन लोकांनी पाहिला असून यावर कमेंट्चा वर्षाव होत आहे.

लॉकडाऊनमुळे कुठे जायला मिळत नाही त्यामुळे ही मुलगी चांगलीच वैतागली आहे. इतकं की ती रडत रडत आपल्या भावना व्यक्त करत आहे. व्हिडिओत ती सांगते की, "लॉकडाऊनमुळे सर्व जग बंद आहे. मला माझं आवडतं आईसक्रीम खायला मिळत नाही. मॅक-डीमध्ये जाऊन बर्गरचा आस्वाद घेता येत नाही. हे सगळं खूप कंटाळवाणं आहे. तुम्हाला सगळ्यांना नाही का वाटत असं?" हा व्हिडिओ 2 मिनिटांचा असून व्हिडिओच्या शेवटी म्हणते की, "सर्व काही बंद करणे गरजेचे आहे नाहीतर लोक आजारी पडतील." हा व्हिडिओ रिलेटेबल असल्याने प्रचंड व्हायरल होत आहे.

पहा व्हिडिओ:

नेटकऱ्यांच्या कमेंट्स:

या लहानगीने ज्या पद्धतीने आपली व्यथा मांडली आहे, ते सर्वांनाच भावत आहे. याच भावना अनेकांच्या आहेत. परंतु, सर्वांनी घरी राहायला हवं अन्यथा सर्व आजारी पडतील, ही तिची सूचना देखील अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे लहान असो किंवा मोठे आपल्याला या परिस्थितीला सामोरे जावेच लागणार आहे.