डिएगो माराडोनाचा फेक व्हिडिओ (Photo Credit: Twitter/Getty)

महान फुटबॉल डिएगो माराडोना (Diego Maradona) बर्‍याचदा चर्चेत राहिले आहेत. त्याचे कोचिंग स्टिंट असोत किंवा लाइव्ह सामने पाहण्यासाठी फुटबॉल स्टेडियममध्ये असो, अर्जेंटिना (Argentina) महान फुटबॉलर बर्‍याचदा सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. आता सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे त्यामधील व्यक्ती माराडोना असल्याचा दावा करण्यात आला आहे. पण, ते मात्र सत्य नाही! या व्हायरल व्हिडिओमध्ये त्यांचे वजन खूप वाढलेले दिसत आहे. ते सुमो रेसलरसारखे दिसत आहे. व्हिडिओमध्ये ते एका बॉलला लाथ मारतानाही दिसत आहे. पण ती व्यक्ती खरोखरच डिएगो माराडोना आहे आणि या महान फुटबॉलरचे वजन इतके वाढले आहे का? सोशल मीडियावर माराडोनाचा हा व्हिडिओ बनावट आहे. सोशल मीडियावर ज्या व्यक्तीला माराडोना म्हणून शेअर केले जात आहे तो प्रत्यक्षात अर्जेन्टिनाचा अभिनेता Roly Serrano आहे. (सिक्स पॅक अ‍ॅब्स, 3000 हुन अधिक फुटबॉल किक-अप; लिओनेल मेस्सीच्या 6 वर्षीय चाहत्याने सोशल मीडियावर घातला धुमाकूळ (Video))

सेरानोचे शरीर अगदी माराडोनासारखे दिसते, म्हणून लोकं त्यांना पाहून फसतात. रॉली सेरानोने टेनिस बॉलला किक मारतानाचा हा व्हिडिओ 2015 मध्ये प्रदर्शित झालेल्या एका हॉलिवूड चित्रपटाचा आहे. हॉलीवूड चित्रपटात 'यूथ'मध्ये माराडोनाचा काल्पनिक पात्र सेरानो यांनी साकारले होते. सेरानोने स्वत: च्या इंस्टाग्राम अकाउंटवर 'यूथ' चित्रपटाचा फोटो शेअर केला ज्यामध्ये तो अगदी माराडोनासारखा दिसत आहे. आणि आता सोशल मीडियावर व्हायरल होणार व्हिडिओ पाहून तुम्हीही गडबडून जाल.पाहा हा व्हायरल होणार व्हिडिओ:

या सर्व गोष्टींवरून हे सिद्ध होते की माराडोनाच्या लठ्ठपणाचा हा व्हिडिओ पूर्णपणे बनावट आहे. आणि व्हिडिओमध्ये दिसणारी व्यक्ती एक अर्जेंटिना अभिनेता रॉली सेरानो आहे. दरम्यान, माराडोना सध्या मायदेशी अर्जेटिनामध्ये जिमनासिया वाई एग्रीगामा क्लबचा प्रशिक्षक आहे. फक्त बुधवारी, त्याने क्लबशी करार वाढविला ज्यामुळे तो 2020-21 हंगाम अखेरपर्यंत कोचच्या भूमिकेत दिसेल. सप्टेंबर 2019 मध्ये त्याला क्लबचा व्यवस्थापक म्हणून नियुक्त करण्यात आले होते.