सिक्स पॅक अ‍ॅब्स, 3000 हुन अधिक फुटबॉल किक-अप; लिओनेल मेस्सीच्या 6 वर्षीय चाहत्याने सोशल मीडियावर घातला धुमाकूळ (Video)
Arat Hosseini (Photo Credit: Instagram)

इराणचा अरात होसेनी (Arat Hosseini) फारच कमी काळात सोशल मीडियावर लोकप्रिय स्टार बनला आहे. इन्स्टाग्रामवर त्याचे फोटो पाहून तुम्ही त्याचे कौतुक केल्या शिवाय राहणार नाही. अरात हा इराणचा फुटबॉल खेळाडू आहे. अशा वेळी जेव्हा एखाद्याला वयाच्या पाचव्या वर्षापासूनच्या गोष्टी आठवत नाही, इराणचा हा पाच वर्षांचा मूल, अरात आपल्या कलागुणांमुळे वयाच्या अवघ्या पाच व्या वर्षी स्टार झाला आहे. क्रिकेटप्रमाणे फुटबॉलमध्ये क्रिस्टियानो रोनाल्डो आणि लिओनेल मेस्सी (Lionel Messi) यांच्यात सर्वोत्तम खेळाडू कोण याबाबत चर्चा सुरु असते. हा कधीही न संपणारा वाद आहे. या दरम्यान मेस्सीचा चाहता अरातने आपल्या कौशल्याने सर्वांना घायाळ केले आणि त्याच्या फुटबॉल कौशल्याने प्रभावित होऊन बार्सिलोना (Barcelona) क्लबने त्याला प्रशिक्षण देण्याची तयारी दर्शवली आहे. अरातने सध्या एका व्हिडिओने सोशल मीडियात धुमाकूळ घातला आहे. या व्हिडिओमध्ये तो न थांबता फुटबॉलला 3000 हुन अधिक किक-अप करताना दिसत आहे.

शिवाय, अरातचे सिक्स पॅक अ‍ॅब्स पाहून यूजर्सना आश्चर्याचा धक्काच बसला. त्याने इतक्या लहान वयात तंदुरुस्त शरीर बनवले आहे, जे त्याच्या फोटोंमधून पहिले जाऊ शकते. त्याचे जिम्नॅस्टिक व्हिडिओही आश्चर्यचकित करणारे आहेत. काही दिवसांपूर्वी महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी एका मुलाचा एक आश्चर्यकारक फुटबॉल कौशल्य दाखविणारा व्हिडिओ ट्विट केला. ते म्हणाले, "जेव्हा मी हा व्हिडिओ पहिल्यांदा पाहिला तेव्हा तो एक लहान मुलगी असल्यासारखे वाटले परंतु प्रत्यक्षात तो 4 वर्षाचा मुलगा आहे."

पाहा अरातचे फोटो आणि चकित करणारे व्हिडिओज

अरातचे सिक्स पॅक अ‍ॅब्स

 

View this post on Instagram

 

Don’t wait for extraordinary opportunities. Seize common occasions and make them great. Orison Swett Marden منتظر فرصت های طلایی نمانید ، فرصت های معمولی را از دست ندهید و آنها را به شرایط استثنایی تبدیل کنید. _____________________________________ Who looses today, won’t find tomorrow There is nothing important as today آن كه امروز را از دست می دهد! فردا را نخواهد یافت هیچ روزی از امروز با ارزشتر نیست. _____________________________________ Who looses today, won’t find tomorrow There is nothing important as today آن كه امروز را از دست می دهد! فردا را نخواهد یافت هیچ روزی از امروز با ارزشتر نیست.

A post shared by Arat Hosseini (@arat.gym) on

फुटबॉल कौशल्य

30 सप्टेंबर, 2013 रोजी जन्मलेल्या, अरात होसेनी हे त्याचे मूळ घर इराणमध्ये 2017 मध्ये घरचे नाव झाले जेव्हा 10 फूट भिंतीवर चढताना त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. अरात सध्या लंडनमध्ये राहत आहे आणि त्याची एकदा बार्सिलोनाकडून खेळण्याची इच्छा आहे. मेस्सीचा हा छोटा सुपरफॅन एक इन्स्टाग्राम सेलिब्रिटी आहे ज्याचे सुमारे चार लाख फॉलोअर्स आहेत.