अजीम प्रेमजी (Photo Credits: Facebook)

कोरोना व्हायरसचा (Coronavirus) प्रभाव विश्वभर होत आहे. भारतातही हा खूप वेगाने पसरत आहे. कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे झगडत असलेल्या देशात, राजकारणींपासून, बॉलिवूड आणि क्रिकेट जगातील प्रत्येकजण लोकं चांगल्या कार्यासाठी शक्य तितकी मदत करण्याचा प्रयत्न करीत आहे. दरम्यान, सोशल मीडियावर एक बातमी मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे ज्यात असे म्हटले आहे की विप्रोचे (WIPRO0  संस्थापक अझिम प्रेमजी (Azim Premji) यांनी कोरोनाविरूद्ध लढाईत 50 हजार कोटींची देणगी दिली आहे. अझीम प्रेमजी यांनी 50 हजार कोटी दान केले आहेत परंतु ते कोरोनाविरूद्ध लढ्यात नाही, तर 2019 मध्ये अझीम प्रेमजी फाऊंडेशनला 52,750 कोटींची देणगी दिली होती. त्या काळात त्यांनी विप्रोमधील आपला 34% हिस्सा दान देण्याचे ठरविले होते. अझीम प्रेमजी फाऊंडेशनचे काम कर्नाटक, उत्तराखंड, राजस्थान, छत्तीसगड, पुडुचेरी, तेलंगणा आणि मध्य प्रदेश व्यतिरिक्त भारताच्या पूर्वोत्तर राज्यांत पसरलेले आहे.

अझीम प्रेमजी फाउंडेशनने शिक्षण क्षेत्रातही महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. या संघटनेने सध्या अनेक क्षेत्रांमध्ये काम करण्यासाठी राज्य सरकारांशी भागीदारी केली आहे. दरम्यान, सध्याच्या आकडेवारीनुसार या व्हायरसमुळे संसर्ग झालेल्या लोकांची संख्या 873 वर पोहचली आहे. यापैकी 17 पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला असून 73 रुग्ण बरे झाले आहेत. सध्या देशात 700 पेक्षा अधिक रुग्ण सक्रिय रूग्ण आहेत, ज्यांचे देशातील वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

चीनमध्ये विनाश केल्यानंतर उर्वरित जगात कोरोना व्हायरसचा झपाट्याने पसरत आहे. आजवर जगभरात 5 लाखाहून अधिक लोकांना या प्राणघातक विषाणूची लागण झाली आहे, तर सुमारे 24 हजार लोकं मरण पावले आहेत. यापैकी एक लाख 20 हजार लोक पूर्णपणे बरे झाले आहेत. भारतात केरळ आणि महाराष्ट्रमध्ये सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण समोर आले आहेत.