गेल्या काही महिन्यांपासून म्हणजेच कोरोना व्हायरस संकटकाळ (Coronavirus Pandemic) सुरु झाल्यापासून फेक न्यूजचे (Fake News) पेव फुटले आहे. या फेक न्यूजची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही. रोज अनेक प्रकारच्या बातम्या सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. यामुळेच पीआयबी फॅक्ट चेक (PIB Fact Check) वेळोवळी बातम्यांमागील सत्याचा उलघडा करत असते. दरम्यान, सध्या सोशल मीडियावर एक बातमी वेगाने फिरत आहे. त्यात विधवा महिला समृद्धी योजने अंतर्गत केंद्र सरकार सर्व विधवा महिलांना पाच लाख रुपये आणि फ्री शिलाई मशीन देणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.
सोशल मीडियावर एक युट्युब व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडिओत केंद्र सरकार 'विधवा महिला समृद्धि योजने अंतर्गत सर्व विधवा महिलांच्या खात्यात 5 लाख रुपये जमा करणार असून फ्री शिलाई मिशन देखील देणार आहे, असा दावा करण्यात आला आहे. पीआयबीने यामागील सत्याचा उलघडा केला आहे. हा दावा खोटा असून सरकारची अशी कोणतीही योजना नसल्याचे पीआयबीने स्पष्ट केले आहे. (Fact Check: नोकरीसाठी सुरक्षा रक्कम म्हणून 14,500 रुपये भरण्यासाठी डिजिटल इंडिया मिशन कडून नियुक्ती पत्रक जारी? काय आहे सत्य?)
Fact Check By PIB:
दावा: एक #Youtube वीडियो में दावा किया जा रहा है कि केंद्र सरकार 'विधवा महिला समृद्धि योजना' के तहत सभी विधवा महिलाओं के बैंक खाते में 5 लाख रुपये की नकद राशि एवं फ्री सिलाई मशीन दे रही है। #PIBFactcheck: यह दावा फर्जी है। केंद्र सरकार द्वारा ऐसी कोई योजना नहीं चलाई जा रही है। pic.twitter.com/hDplDHh9eb
— PIB Fact Check (@PIBFactCheck) December 10, 2020
यापूर्वी देखील अशा प्रकारच्या अनेक खोट्या, दिशाभूल करणाऱ्या बातम्या सोशल मीडियावर व्हायरल होत होत्या. त्यातील अनेक बातम्यांचा खुलासा पीआयबीकडून करण्यात आला आहे. तसंच अशा प्रकारच्या बातम्यांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहनही सरकारकडून सातत्याने करण्यात येत आहे.