Fact Check: आंतरराष्ट्रीय गायक रिहाना (Rihana) ने शेतकरी चळवळीबद्दल ट्विट केल्यानंतर देशभरातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत असल्याचं पाहायला मिळत आहे. काही लोकांनी रिहानाच्या ट्विटचं कौतुक केलं तर काही लोकांनी तिचा विरोध केला. बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतने रिहानाच्या ट्विटचा विरोध केला आहे. कंगनाने रिहानाला या प्रकरणापासून दूर राहण्याचा सल्ला दिला. मात्र, सध्या सोशल मीडियावर रिहानाचे एक ट्विट व्हायरल होत आहे. यात रिहानाने कंगनावर शाब्दिक हल्ला केला आहे. या ट्विटमध्ये असं लिहलं आहे की, मी आपल्या डान्सर्संना कंगना रनौतच्या 5 चित्रपटांपेक्षा जास्त पैसे देते. या ट्विटच्या माध्यमातून रिहानाने कंगनावर थेट हल्ला केला आहे.
रिहानाने काही दिवसांपूर्वी सीएनएन मध्ये शेतकरी आंदोलनाबद्दल प्रसिद्ध केलेला लेख ट्विट करुन लोकांना विचारलं होतं, आपण याबद्दल बोलतोय का? यानंतर अनेक नामांकित आंतरराष्ट्रीय कलाकारांनी रिहानाच्या ट्विटचे समर्थन केले. त्यानंतर कंगना रनौतने रिहानाला मूर्ख म्हणत आंदोलनात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना दहशतवादी म्हटलं होतं. (वाचा - Fact Check: शेतकरी आंदोलनावर ट्विट केल्यानंतर पॉप सिंगर रिहाना चा हातात पाकिस्तानच्या झेंडा घेतलेला फोटो व्हायरल; जाणून घ्या सत्य)
परंतु, प्रश्न असा आहे की, सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेलं ट्विट रिहानाने खरंच केले आहे का? तर नाही. हे ट्विट बनावट आहे. खरं तर हे ट्विट एक फोटोशॉप आहे. जे रिहानालाच्या नावाने व्हायरल होत आहे. या ट्वीटची वेळ पाहिली तर, हे ट्विट रिहानाच्या अधिकृत खात्यावर दिसत नाही. त्यामुळे कंगनाच्या विरोधात व्हायरल होणारे हे ट्विट बनावट आहे.