Viral WhatsApp post wrongly attributed to Ratan Tata (Photo Credits: WhatsApp)

कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) संकटकाळात अर्थव्यवस्थेवर भीषण परिणाम होत आहे अशा प्रतिक्रिया मागील काही काळात आपण अनेकदा ऐकल्या असतील, वास्तविक हे सत्य असले तरी यावेळी अर्थव्यवस्थेपेक्षा देशवासियांचा प्राण वाचवणे गरजेचे आहे हे ही तितकचं खरं आहे. अशाच पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर एक पोस्ट सध्या व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे ही पोस्ट ही रतन टाटा (Ratan Tata)  यांच्या नावे आहे. "कोरोनामुळे काही तज्ञ अर्थव्यवस्था खालवण्याचा अंदाज वर्तवत आहे. मला या तज्ञांबद्दल जास्त माहिती नाही.परंतु मला खात्री आहे की त्यांना मानवी प्रेरणा आणि दृढ प्रयत्नांचे मूल्य याबद्दल काहीही माहिती नाही" असे या पोस्ट मध्ये म्हणण्यात आले आहे. स्वतः रतन टाटा यांच्या नावावर ही पोस्ट असल्याने अनेकांनी यावर विश्वास ठेवून हा मॅसेज फॉरवर्ड सुद्धा केला आहे. मात्र या पोस्ट मधील विचार हे टाटा यांचे नाहीत असे स्पष्टीकरण स्वतः टाटा यांनी ट्विटच्या माध्यमातून दिले आहे. काय आहे ही पोस्ट आणि त्यावर रतन टाटा यांनी काय स्पष्टीकरण दिले हे जाणून घ्या..

हेही वाचा- Coronavirus: कोरोना व्हायरस विरोधात लढण्यासाठी टाटा ट्रस्टकडून 500 कोटींची मदत जाहीर

रतन टाटा यांच्या नावे व्हायरल होणारी पोस्ट

कोरोनामुळे काही तज्ञ अर्थव्यवस्था खालवण्याचा अंदाज वर्तवत आहे. मला या तज्ञांबद्दल जास्त माहिती नाही.परंतु मला खात्री आहे की त्यांना मानवी प्रेरणा आणि दृढ प्रयत्नांचे मूल्य याबद्दल काहीही माहिती नाही.

मुळात तज्ञांवर विश्वास ठेवल्यास, दुसर्‍या महायुद्धात झालेल्या जपानला विनाशानंतर भविष्य नव्हते. पण त्याच जपानने अवघ्या 3 दशकांत अमेरिकेला बाजारपेठेत मागे टाकले.

इस्रायलला अरबांनी जगाच्या नकाशावरून पुसून टाकले असावे असा अंदाज तज्ञांनी वर्तवला होता, पण वस्तुस्थिती वेगळी आहे.

एरोडायनामिक्सच्या नियमांनुसार, बंबल बी उडू शकत नाही. परंतु ती उडते, कारण तिला एरोडायनामिक्सचे नियम माहित नसते. त

ज्ञांच्या अंदाजानुसार 83 क्रिकेट विश्वचषकात भारत कुठेच नसला असता पण त्याचे काय झाले? तज्ञांच्या मते 4 ऑलिम्पिक सुवर्ण पदके जिंकणारी पहिली अमेरिकन महिला विल्मा रुडॉल्फ, ब्रेसेसशिवाय चालण्याची स्थिती असू शकत नव्हती, तर धावण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता.

तज्ञांच्या नुसार अरुणिमा सिन्हा केवळ सामान्य आयुष्य जगू शकतात. पण तिने एव्हरेस्ट पर्वतारोहण केले.

अशाच प्रकारे कोरोनाचे संकट वेगळे नाही. मला यात शंका नाही की, आम्ही कोरोनाला पराभूत करु आणि भारतीय अर्थव्यवस्था उत्तम प्रकारे परत येईल.

- रतन टाटा

रतन टाटा यांचे स्पष्टीकरण (ट्विट)

संबंधित व्हायरल पोस्ट वर रतन टाटा यांनी माहिती देत, हे आपण लिहिलेलं किंवा मांडलेलं मत नाही, जर का मला असे काही सांगायचे असेल तर मी ते माझ्या अधिकृत माध्यमातून मांडेन. त्यामुळे यावर कोणीही विश्वास ठेवू नका. सर्वांनी सुरक्षित राहा.

दरम्यान, सोशल मीडियावरून अनेकदा मोठमोठ्या मंडळींच्या नावे असे मॅसेज व्हायरल होत असतात, पण त्यावर थेट विश्वास ठेवू नये कारण हे अधिकृत माहितीचे स्रोत नाहीत, लोकांनी या अफवांच्या जाळ्यात अडकून पडू नये अशी आपणा सर्वांस विनंती आहे.