PIB Fact Check (Photo Credits-Twitter)

Fact Check: एका प्रमुख हिंदी वृत्तपत्राने नुकत्याच एका रिपोर्टमध्ये असा दावा केला होता की, सर्व खाद्य व्यवसायिकांकडे जसे फूड स्टॉल, हॉटेल, रेस्टॉरंट आणि घरी बनवून विक्री करणाऱ्या विक्रेत्यांकडे FSSAI चा परवाना असणे अनिवार्य आहे. रिपोर्ट हा अशंत: चुकीचा आहे. हा रिपोर्ट सोशल मीडियात तुफान व्हायरल होत आहे. सत्य असे आहे की, सरकारने स्पष्ट करत असे म्हटले की फक्त 20 करोड रुपयांहून अधिक वार्षिक उत्पन्न असलेल्या व्यावसायिकांना FSSAI लायनन्स घेणे अत्यावश्यक आहे.(Fact Check: जनधन खात्यातून पैसे काढण्यासाठी प्रत्येक वेळेस आकारले जाणार 100 रुपये? जाणून घ्या सत्य)

दैनिक भास्करच्या एका रिपोर्ट मध्ये असा दावा केला आहे की, खाद्य व्यवसाय ऑपरेटरांना FSSAI लायसन्स घ्यावे लागणार आहे . हा दावा सत्यात खोटा आहे. एफएसएसएआय लायसन्स फक्त 20 कोटी रुपयांहून अधिक वार्षिक उत्पन्न असलेल्या व्यावसायिकांसाठीच अनिवार्य आहे. PIB फॅक्ट चेक कडून याबद्दल खुलासा करण्यात आला आहे.(Fact Check: किसान विकास मित्र समिती कृषी मंत्रालयाच्या वेबसाईटद्वारे देत आहे नोकरीची संधी? PIB ने सांगितले सत्य)

याच दरम्यान, फेडरेशन ऑफ हॉटेल अॅन्ड रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ इंडिया ने FSSAI ने घरात तयार करण्यात आलेल्या खाद्य विक्रेत्यांसाठी अनिवार्य नोंदणीच्या पावलाचे स्वागत केले आहे. ज्यामुळे ग्राहकांना आपल्या आरोग्यासंबंधित होणाऱ्या त्रासापासून बचाव करण्यास मदत करणार आहे. FHRAI ने असे म्हटले की, खाद्य ऑपरेटर किंवा डार्क किचन मधून काम करणाऱ्यांनी स्वच्छता आणि त्या संबंधित नियमांचे पालन करावे.