Fact Check: जनधन खात्यातून पैसे काढण्यासाठी प्रत्येक वेळेस आकारले जाणार 100 रुपये? जाणून घ्या सत्य
Fake Viral News (Photo Credits: PIB Fact Check)

कोविड-19 (Covid-19) चे संकट सुरु झाल्यापासून वाढलेले फेक न्यूजचे (Fake News) प्रस्थ अद्याप कमी झालेले नाही. कोरोना व्हायरसचा (Coronavirus) संसर्ग नियंत्रण येऊ लागला असला तरी खोट्या आणि दिशाभूल करणाऱ्या पोस्ट, बातम्या यांचे सत्र सुरुच आहे. अशीच एक बातमी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात जनधन खात्यातून (Jandhan Account) पैसे काढताना प्रत्येक वेळेस 100 रुपये शुल्क आकारला जात आहे, असा दावा करण्यात आला आहे. दरम्यान, पीआयबीने (PIB) या मागील सत्य तपासले असून ही बातमी खोटी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

बँकांनी आपल्या नियमांत बदल केल्यामुळे शुल्क आकारले जात आहे. याची सुरुवात बँक ऑफ बडोदा ने प्रथम केली असून आता जनधन खात्यातून पैसे काढतानाही शुल्क आकारले जाणार असल्याचे या पोस्टमध्ये म्हटले आहे. दरम्यान, ही बातमी खोटी असल्याचे पीआयबी फॅक्ट चेकने स्पष्ट केले आहे. (Fact Check: आयुष्यमान भारताच्या वेबसाइटवर 'आयुष्मान मित्र भर्ती 2020' ची घोषणा? PIB ने केला व्हायरल YouTube व्हिडिओचा खुलासा)

पीआयबीने आपल्या ट्विटमध्ये लिहिले, "हा दावा खोटा आहे. जनधन खात्यांच्या बँकिंग सेवेसाठी कोणतेही शुल्क नाही. ती सेवा विनामुल्य आहे. या संदर्भात आरबीआयच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन केले जाते."

Fact Check By PIB:

यापूर्वी बँक ऑफ बडोदा ने देखील बचत खात्यातून पैसे काढण्यासाठी आणि जमा करण्यासाठी चार्ज वाढवले असल्याचे सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या पोस्टमध्ये म्हटले होते. तसंच आयुष्यमान भारताच्या वेबसाइटवर 'आयुष्मान मित्र भर्ती 2020' ची घोषणा झाल्याची माहिती देणारा युट्युब व्हिडिओ व्हायरल होत होता. पीआयबी फॅक्ट चेकने याबद्दलचा खुलासा करत ही बातमी खोटी असल्याचे स्पष्ट केले आहे.