केरळच्या (Keral) कोझिकोड (Kozhikode) येथे एअर इंडिया चे IX-1344 विमान लॅंडिगवेळी (Air India Flight Crash) धावपट्टीवर कोसळल्याने भीषण अपघात झाला होता, यामध्ये भारतीय हवाईदलातील मानाचा असा 'स्वॉर्ड ऑफ ऑनर' (Sword Of Honour) पुरस्कार प्राप्त असलेले वैमानिक दीपक साठे (Captain Deepak Sathe) यांचे निधन झाले आहे. एअर इंडियातील एक अनुभवी आणि कुशल वैमानिक अशी त्याची ओळख होती. या दुर्घटनेनंंतर साठे यांना श्रद्धांंजली वाहणारे अनेक ट्विट्स आणि पोस्ट करण्यात आले आहेत. यासोबतच एक खास व्हिडिओ सुद्धा कालपासुन सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात भारतीय हवाई दलाच्या (IAF) वार्षिक संंमेलनात दीपक साठे हे गाणंं गात आहेत असा मॅसेज लिहुन व्हिडिओ व्हायरल करण्यात आला आहे. मात्र जरा तपास केल्यास हा व्हिडिओ खोटा असल्याचे लक्षात येते. काय आहे हा नेमका प्रकार जाणुन घ्या.
कॅप्टन दीपक साठे यांंच्या निधनानंंतर सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओला दिलेल्या कॅप्शन मध्ये दीपक साठे हे हवाई दलाच्या वार्षिक संमेलनात "घर से निकलते ही" हे गाणं गात आहेत असे सांंगण्यात आले आहे. Air India Express plane Crash: महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी वैमानिक दीपक साठे यांच्या कुटुंबियाची घेतली भेट
पहा व्हायरल व्हिडिओ
Capt Deepak Sathe singing at IAF annual day celebrations pic.twitter.com/xQRoVm7enR
— Narendra Sinh Rathod (@Narendr31492275) August 8, 2020
मात्र हा व्हिडिओ मुळात दीपक साठे यांचा नसल्याचे आमच्या तपासात समोर आले आहे. हा हवाई दलाच्या नव्हे तर नौदलाच्या कार्यक्रमातील व्हिडिओ आहे. आणि यात गात असणारे दीपक साठे नसुन नौदलातील Vice Admiral गिरिश लुथरा हे आहेत. या कार्यक्रमाचा जुना व्हिडिओ सुद्धा युट्युब वर आहे. यात लुथरा यांचे नाव उद्गारल्याचे ऐकु येतेय.
गिरिश लुथरा यांंचा Original Video
दरम्यान, या व्हिडिओची सच्चाई माहित नसल्याने अनेकांनी हा व्हिडिओ आतापर्यंत शेअर केला आहे. दीपक साठे हे एअर इंडियाच्या एअरबस310 विमान आणि बोइंग 737 विमानांचे उड्डाण केलेले वैमानिक होते. वंदे भारत मिशन अंंतर्गत दुबईहुन भारतीय नागरिकांंना मायदेशी आणताना केरळ येथे झालेल्या अपघातात दीपक साठे यांनी प्राण गमावले मात्र त्यांच्या समय सुचकतेने अन्य 160 हुन अधिक प्रवाशांंचे प्राण वाचले आहेत.