केरळमधील (Kerala) कोझिकोडच्या (Kozhikode) करीपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर शुक्रवारी रात्री एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानाचा भीषण अपघात (Air India Express plane Crash) झाला. दुबईहून 191स ममन प्रवाशांना घेऊन आलेले एअर इंडिया एक्स्प्रेसचे विमान विमानतळावर उतरताना धावपट्टीवरून घसरले. या दुर्घटनेत मुंबईतील वैमानिक दीपक साठे (Deepak Sathe) यांच्यासह 18 जणांचा मृत्यू, तर 127 प्रवासी जखमी झाले आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी दिवंगत दिपक साठे यांच्या नागपूर येथील निवासस्थानी जाऊन त्यांच्या कुटुंबियाची भेट घेतली आहे.
दुबईहून 191 प्रवाशांना घेऊन आलेले एअर इंडिया एक्स्प्रेसचे विमान केरळमधील कोझिकोडच्या करीपूर विमानतळावर हे विमान रात्री 7. 41 वाजता उतरत असताना धावपट्टीवरून घसरले आणि खड्डयात कोसळले होते. हा अपघात एवढा भीषण होता की, विमानाचे दोन तुकडे झाले. विमानाने उतरताना धावपट्टी सोडली आणि ते कुंपणाच्या भिंतीवर आदळून 30 फुटी खड्ड्यात कोसळले. त्यामुळे त्याचे दोन तुकडे झाले. यात भयंकर अपघातात 18 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर, 127 जण जखमी झाले आहेत. हे देखील वाचा- Air India Express Plane Crash Update: केरळ एअर इंंडिया विमान अपघातातील दोन जखमींना कोरोनाची लागण; बचावकार्यातील सर्वांची COVID 19 Test होणार
अनिल देशमुख यांचे ट्वीट-
केरळमधील कोझिकोड येथील विमान दुर्घटनेत दुर्दैवाने मृत्यू पावलेल्या कॅप्टन दीपक साठे यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. कॅप्टन साठे यांच्या कुटुंबीयांची विचारपूस करून सांत्वन केले. pic.twitter.com/56x07EuqAS
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) August 8, 2020
संपूर्ण भारत कोरोनाच्या संकटाशी लढत असताना केरळमधील कोझिकोडच्या करीपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर घडलेल्या घटनेने सर्वांचे लक्ष केंद्रीत करून घेतले आहे. या घटनेवर संपूर्ण देशातून हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, सर्व सामान्यांपासून ते अनेक राजकीय नेते आणि कलाकारांनी या घटनेवर शोक व्यक्त केला आहे.