Air India Express Plane Crash Update: केरळ एअर इंंडिया विमान अपघातातील दोन जखमींना कोरोनाची लागण; बचावकार्यातील सर्वांची COVID 19 Test होणार
Air India Express Plane Crash Update (Photo Credits: ANI)

 Air India Express Plane Crash: दुबईहून 191 प्रवाशांना घेऊन आलेले एअर इंडिया एक्स्प्रेसचे विमान केरळमधील कोझिकोडच्या (Kozhikode) करीपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरताना धावपट्टीवरून घसरल्याने शुक्रवारी रात्री भीषण अपघात झाला. या दुर्घटनेतील मृतांची संख्या 18 वर पोहोचली असून यात 2 वैमानिकांचा समावेश आहे. तर 127 प्रवासी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जवळील रुगणालयात उपचार सुरु आहेत. सध्या याबाबत एक नवे अपडेट समोर येत असुन या जखमींमधील 2 जण हे कोरोनाबाधित असल्याचे आढळुन आले आहे यामुळे चिंंतेत आणखीन भर पडली आहे. केरळच्या आरोग्यमंत्री के. के.शैलजा (K . K.  Shailaja)  यांंनी या अपघातानंतर बचावकार्यार सहभाग घेतलेल्या सर्वांना स्वतःहुन Qurantine करुन घेण्यास सांगितले आहे. राज्य सरकार तर्फे सर्वांची कोरोना चाचणी होणार असल्याचे सुद्धा शैलजा यांंनी सांगितले आहे.

या अपघाताविषयी आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसाअर, एयर इंडियाच्या आयएक्स 1344 (IX1344) विमानाने संध्याकाळी दुबईहून उड्डाण घेतले. हे विमान करीपूर विमानतळावर उतरताना धावपट्टीवरून घसरुन कोसळले आणि विमानाचे दोन तुकडे झाले. विमानात 180 प्रवासी आणि 6 क्रू सदस्य होते. जखमी प्रवाशांना मलप्पुरम आणि कोझिकोड जिल्ह्यातील रूग्णालयात दाखल करण्यात आले. 22 जणांना प्रथमोपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे. Sword of Honor असलेल्या वैमानिक दीपक साठे यांचा केरळमधील कोझिकोड येथे Air India विमान अपघातात मृत्यू

यावेळी सुदैवाने विमानाने पेट घेतला नाहीतर परिस्थिती आणखीन वाईट झाली असती असे केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री हरदीपसिंह पुरी (Hardeep Singh Puri) यांनी म्हंटले आहे. आज केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन, राज्यपाल आरिफ मोहम्मद खान हे सुद्धा घटनास्थळी भेट देणार आहेत.

दरम्यान, अपघातग्रस्त विमानामधून डिजिटल फ्लाइट डेटा रेकॉर्डर (डीएफडीआर) ताब्यात घेण्यात आला आहे. कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डर (सीव्हीआर) परत मिळवण्यासाठी फ्लोरबोर्ड कापला जात आहे यातुन नेमका अपघात कशामुळे झाला याची माहिती घेण्यास मदत होईल असे नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाचे (डीजीसीए) अधिकार्‍यांनी सांगितले आहे.