Fact Check: गणपती सारखा चेहरा असणाऱ्या बाळाचा फोटो सोशल मीडियात तुफान व्हायरल, जाणून घ्या सत्यता
Baby Face Like Lord Ganesha (Photo Credits-Instagram)

Fact Check: सोशल मीडियात एका अनोख्या बळाचा फोटो तुफान व्हायरल होत आहे. त्यामध्ये बाळाचे नाक हे हत्तीच्या सोंडेसारखे असल्याचे दिसून येत आहे. म्हणजेच हुबेहुब गणपीचा चेहऱ्याचे ते बाळ असल्याचे भासत आहे. फोटोला कॅप्शन सुद्धा याच पद्धतीने दिले गेले असून त्यामध्ये आश्चर्य दर्शवणारे इमोजीचा सुद्धा वापर केला गेला आहे. युजरने हा फोटो शेअर करत म्हटले आहे, 'जय श्री गणेशाय नम:' परंतु व्हायरल झालेल्या फोटोमागील सत्यता तुम्ही जरुर जाणून घ्या.(Emoji Snake Viral Video: स्माइली इमोजी असणाऱ्या सापाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल; अनोखा साप पाहून तुम्हीही व्हाल हैराण)

इंडिया टुडे च्या अॅन्टी फेक न्यूज वॉर रुम यांनी यामागील सत्यता शोधून काढली आहे. त्यांनी असे म्हटले आहे की, गणपती सारख्या दिसणारे मुल जे सोशल मीडियात व्हायरल होतोय तो खरा नाही आहे. त्यामधील बाळ खरे नाही आहे. ही एक कलाकृती असून ती ऑस्ट्रेलियातील कलाकार पैट्रिशिया पिचिनिनी यांनी बनवली आहे. तर गणपतीच्या चेहऱ्यासारख्या मुलाचा फोटो पाहून लोक त्याला गणपतीचा आशीर्वाद असल्याचे म्हणत आहेत. परंतु ते मुल कधी आणि कोठे जन्मले याबद्दल कोणीही चर्चा करत नाही आहेत.(Goat Viral Video: बकरी सोबत सेल्फी घेणं महिलेला पडलं महागात; रागाच्या भरात शेळीने केला हल्ला, पहा व्हिडिओ)

दरम्यान, हा फोटो पैट्रिशिया हिने तिच्या सोशल मीडियातील इन्स्टाग्राम अकाउंवर शेअर केला आहे. तर नॅशनल गॅलरी ऑफ ऑस्ट्रेलियाच्या मते न्यूबॉर्न कलाकृतिच्या माध्यमातून पैट्रिशिया हिने शरीरात होणारे बदलावांमुळे येणारी ग्लानी आणि अस्वस्थता दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु गणपतीच्या चेहऱ्याचा मुलगा जन्मल्याचा भ्रम पसरवला जात असल्याचे हे आता स्पष्ट झाले आहे.