Pune Police Perform Kanyadan (PC - ANI)

लॉकडाऊनमुळे (Lockdown) आई-वडिलांना लग्नात सहभागी होता आलं नाही म्हणून पुणे पोलिसांनी (Pune Police) एका जोडप्याचं लग्न लावून दिलं आहे. विषेश म्हणजे लग्नाचे सर्व विधी पोलिसांनीचं पार पाडले असून कन्यादानाचा विधीही पोलिसांनीचं पार पाडला आहे. या जोडप्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या जोडप्याने लग्नासाठी आयुक्तांची परवानगी घेतली होती. त्यानंतर पोलिस अधिकारी प्रकाश यांनी या जोडप्याचं लग्न लावण्यास महत्त्वाची भूमिका बजावली.

पोलिसांनी केलेल्या या सहकार्यानंतर या नवविवाहित जोडप्याने पोलिसांचे आभार मानले आहेत. पोलिसांमुळे आमचं लग्न होऊ शकलं, अशा शब्दांत त्यांनी सर्वाचे आभार मानले आहेत. (हेही वाचा - Fact Check: प्रधानमंत्री मास्क योजनेअंतर्गत मास्कचे फ्री वाटप? PIB ने सांगितले व्हायरल मेसेज मागील सत्य)

यावेळी या जोडप्याने तोंडाला मास्क बाधून लग्नाचे सर्व विधी पूर्ण केले आहेत. सध्या देशात तसेच राज्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर देशातील तसेच राज्यातील लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्यात आला आहे. सध्या लग्नाच्या मुहूर्ताला सुरुवात झाली आहे. परंतु, लॉकडाऊनमुळे अनेकांना लग्नाच्या तारखा पुढे ढकलाव्या लागत आहेत.