आयर्लंडचे उप पंतप्रधान (Ireland Deputy Prime Minister) भारतीय वंशाचे आणि त्यातही आपल्या कोकणातील लिओ वराडकर (Leo Varadkar) हे मुलाखत देत असताना एका महिलेने त्यांच्या तोंडावर ड्रिंक फेकल्याचा एक व्हिडिओ जोरदार सोशल मीडिया (Social Media) वर व्हायरल झाला आहे. कोरोना व्हायरस संक्रमन नियंत्रणाबाब आधारीत माहिती देणाऱ्या एका व्हिडिओसाठी चित्रिकरण सुरु आहेत. लिओ वराडकर या व्हिडिओसाठी कॅमेऱ्यासमोर माहिती देत होते. तोंडाला फेस मास्क लावलेली एक महिला तेथे अचानक आली आणि तिने वराडकर यांच्या तोंडावर ड्रिंक्स फेकले.हा व्हिडिओ व्हायरल (Leo Varadkar Viral Video) झाला आहे.
द गार्जियन या संकेतस्थळाने दिलेल्या वृत्तानुसार, तोंडावर मास्क लावलेली आणि एका हातात स्केटबोर्ड घेतलेली एक महिला लिओ वराडकर हे ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी आली. सर्वांचे लक्ष तिच्याकडे पोहोचण्याच्या आत तिने आपल्या हातात असलेल्या पांढऱ्या रंगाच्या कपातून वराडकर यांच्या दिशेने एक द्रव पदार्थ फेकला. त्यानंतर संबंधित महिला तिथून लगेच पळूनही गेली. हा द्रव पदार्थ ड्रिंक असल्याचे समजते.
दरम्यान, ही घटना घडल्यानंतर लिओ वराडकर यांनी सांगितले की, महिलेने असे काही करण्यापूर्वीच माझी मुलाखत आणि तिचे चित्रीकरण संपले होते. मात्र, त्यांनी सांगितले की हे बरे झाले की, ही घटना माझी मुलाखत झाल्याच्या नंतर घडली. जेणेकरुन मुलाखतीत कोणत्याही प्रकारचा अडथळा आला नाही. दरम्यान, अशी घटना घडली तरीही आपण अतिरिक्त सुरक्षेची मागणी करणार नाही, असे वराडकर यांनी सांगितले. (हेही वाचा, Coronavirus: आयर्लंडचे मराठी वंशाचे पंतप्रधान डॉ. लिओ वराडकर यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आभारासाठी फोन)
You can dislike Leo Varadkar, you can criticise his policies, you can disagree with him, but this is nasty and unnecessary thing to do. pic.twitter.com/ze8eVByU3S
— Darren Cleary (@RadioCleary) September 18, 2020
दरम्यान, पुढे बोलाना वराडकर यांनी सांगितले की, तिच्या हातातील स्केटबोर्ड पाहून मला ती पॉप गायक एवरिल लविग्ने असेल असे वाटले. पण ती महिला लिविग्ने नव्हतीच. तिच्याकडे आणखी एक कपही होता जो माझ्या चेहऱ्यावर तिने संपवला. तिने माझा सूट खराब केला पण माझ्याकडे आणिखी एक सूट होता, अशी मिष्कील टीप्पणीही वराडकर यांनी केली.
दरम्यान, या घटनेचा अनेक आयरीश राजकीय नेत्यांनी निषेध केला आहे. तसेच त्याबाबतचे व्हिडिओही शेअर केले आहेत. माजी राष्ट्रपती पदाचे उमेदवार गेविन डफी यांनी ट्विट करत म्हटले आहे की, वराडकर यांच्यासोबत झालेली ही घटना अत्यंत भायावह आणि निषेधार्ह आहे.