
Viral Video: एका मुलीचा आणि तिच्या वडिलांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. वडील आपल्या मुलीला सरप्राईज देतात जे मुलीला इतके आवडते की, ती आनंदाने उड्या मारते. व्हिडिओ पाहिल्यानंतर समजतं की, मुलीच्या वडिलांना फूड डिलिव्हरी कंपनी स्विगी (Swiggy) मध्ये नोकरी (Job) मिळाली. त्यामुळे या मुलीला प्रचंड आनंद होतो आणि ती आपल्या वडिलांना मिठी मारते.
हा व्हिडिओ पूजा अवंतिका नावाच्या युजरने इन्स्टाग्राम रीलवर अपलोड केला आहे. वडिलांनी दिलेले सरप्राईज पाहून मुलीने आनंदाने उडी मारल्याचं या व्हिडिओत पाहायला मिळत आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये यूजरने लिहिले - अप्पांची नवीन नोकरी, आता मी माझे आवडते पदार्थ खाऊ शकते. हा व्हिडिओ आठ लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. तर 51 हजारांहून अधिक लाईक्स आणि हजारो कमेंट्स आल्या आहेत. (हेही वाचा -Mumbai Local Train: लोकलमध्ये जागेवरून महिलांमध्ये तुंबळ हाणामारी; Watch Video)
मुलगी नुकतीच शाळेतून घरी पोहोचल्याचे व्हिडिओत दिसत आहे. तिचे डोळे बंद आहेत. काही वेळाने तिने डोळे उघडले तर समोर तिला वडील स्विगी टी-शर्ट घातलेले दिसतात. यावरून या मुलीच्या वडिलांना नवीन नोकरी मिळाल्याचे दिसून येते. ज्यावर मुलगी आनंदाने उडी मारते आणि वडिलांना मिठी मारते.
View this post on Instagram
या व्हिडिओवर हजारो लोकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूजरने लिहिले की, "सर, तुम्ही भाग्यवान आहात की तुम्हाला अशी परी मुलगी मिळाली." दुसऱ्या युजरने लिहिलं आहे की, "मी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला आयुष्यातील सर्व आनंदासाठी शुभेच्छा देतो." तिसर्या व्यक्तीने लिहिले आहे की, "हे खूप सुंदर आहे..ऑल द बेस्ट अण्णा." एकाने लिहिले, "देव तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबावर सदैव आशीर्वाद देत राहो."