Fight between the women for seat in mumbai local (PC - Instagram )

Mumbai Local Train: सध्या सोशल मीडियावर मुंबई लोकल ट्रेन (Mumbai Local Train) मधील महिला प्रवाशाच्या हाणामारीचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. लोकलमधील सीटवरून झालेल्या वादाचे रुपांतर तुंबळ हाणामारीत झाले. या व्हिडिओमध्ये तीन महिना एकमेकींना चापट आणि केस ओढताना दिसल्या.

इंस्टाग्रामवर शेअर केलेला या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. फुटेजमध्ये तीन स्त्रियांमध्ये सुरुवातील जागेवरून वाद झाल्याचं दिसून येते. यात त्या एकमेकींना तुंबळ चार देताना दिसत आहेत. इंस्टाग्रामवर ही पोस्ट शेअर करणाऱ्या युजरने म्हटलं आहे की, यामध्ये आई आणि मुलगी एका बाजूने असून त्यांनी सीटवर बसलेल्या दुसर्‍या महिलेला मारहाण केली. (हेही वाचा -  Uber Driver Threatens Manava Naik: मराठी अभिनेत्री मनवा नाईकला उबर चालकाने धमकावले; म्हणाला, 'थांब तुला दाखवतोच आता')

 

View this post on Instagram

 

A post shared by Sharifaizan Sayed (@sharifasayed7)

मुंबई लोकलमध्ये महिलांमध्ये जागेवरून भांडण होण्याची ही पहिली वेळ नाहीये. कारण, यापूर्वी महिलांचे लोकलमधील हाणामारीचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत. या महिन्याच्या सुरुवातीला, एका 27 वर्षीय महिलेला ठाणे-पनवेल ट्रेनमध्ये सुरू असलेल्या भांडणात हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करणाऱ्या सहप्रवासी आणि महिला कॉन्स्टेबलवर शारीरिक अत्याचार केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. 5 ऑक्टोबर रोजी घडलेल्या घटनेनंतर महिला कॉन्स्टेबलला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.