Representational Image | (Photo Credits: PTI)

माहिती आणि तंत्रज्ञानामध्ये जशी प्रगती होत आहे तसा आपला नियमित व्यवहार करण्यासाठी आता आपण अनेक अ‍ॅप्सला पसंती देत आहोत. पण यामधून अनेक ऑनलाईन फ्रॉड होत असल्याचं समोर आलं आहे. मुंबईमध्ये नुकताच समोर आलेला ऑनलाईन फ्रॉड (Online Fraud)  हा एका महिला डॉक्टर आणि तिच्या फ्रेंड सोबतचा आहे. या दोघांची 2.55 लाखांची फसवणूक झाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायबर स्कॅम फ्रॉडमध्ये 27 वर्षीय डॉक्टर आणि तिच्या फ्रेंडने 2.55 लाख गमावले आहेत.

क्रिप्टोकरन्सी मध्ये गुंतवणूक आणी पार्ट टाईम जॉब यांचं आमिष दाखवून या दोन जणांची फसवणूक झाली आहे. हिंदूस्तान टाईम्सच्या माहितीनुसार, डॉ. हेमल दवे या महिला डॉक्टरने पोलिसत तक्रार नोंदवली तेव्हा हे प्रकरण प्रकाशझोतात आलं. एका खाजगी हॉस्पिटल मध्ये काम करत असलेल्या या डॉक्टरनी कुरार पोलिस स्टेशन मध्ये तक्रार नोंदवली आहे. या तक्रारीमध्ये दवे यांनी 12 जानेवारीला आपल्याला एक व्हॉट्सअ‍ॅप मेसेज आला त्यामध्ये पार्ट टाइम टाईम जॉब बद्दल माहिती दिली होती. नक्की वाचा: Arjun Khotkar, Cryptocurrency-Vijay Zol: अंडर-19 क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विजय झोल याच्याविरुद्ध गुन्हा दाखल.

दवे यांनी नोकरीच्या तपशीलांबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी पटकन उत्तर दिले. तेव्हा तिला सांगण्यात आले की तिला YouTube व्हिडिओंना पॉझिटिव्ह रिव्ह्यू द्यावा लागेल ज्याच्या बदल्यात पैसे मिळतील. या घटनेबद्दल बोलताना एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, "दवे काही कामे पूर्ण केली आणि त्या बदल्यात तिला अल्प रक्कम दिली गेली, ज्यामुळे तिला खात्री पटली की ती खऱ्या पार्टीशी व्यवहार करत आहे."

काही काळ सारं असंच चालू ठेवण्यात आले. त्यानंतर संध्याकाळच्या वेळेस आरोपीने त्या महिलेला बिटकॉईन अ‍ॅप इन्स्टॉल करण्यास सांगितले. हा त्याच टास्कचा भाग असल्याचं सांगितलं. आरोपीच्या सूचनेनुसार, दवेने अॅपमध्ये वाढत्या प्रमाणात पैसे हस्तांतरित करण्यास सुरुवात केली, ज्यामुळे तिला दिसून आले की तिच्या गुंतवणुकीला आधीच चांगला परतावा मिळत आहे."

अधिकाऱ्याने सांगितले की, मोठ्या नफ्याचे आमिष दाखवलेल्या दवेने अॅपमध्ये दोन दिवसांत 1.55 लाख रुपये भरले. दरम्यान, जास्त गुंतवणुकीमुळे चांगला परतावा मिळेल असे सांगून आरोपीने दवेला अधिक गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केले. यानंतर दवेने तिच्या मैत्रिणीकडे एक लाख रुपये जमा करण्यास सांगितले. पण जेव्हा दवेने रिटर्न्सबद्दल प्रश्न विचारला तेव्हा परिस्थिती बिघडलेली होती.

आरोपीने त्यानंतर तिला उत्तर देताना तिच्याकडून काहीतरी चूक झाली आहे. त्यामुळे आता 2 लाख रूपये भरत नाही तोपर्यंत चांगले रिटर्न मिळणार नसल्याचं तो म्हणाला. तिला जे प्रॉमिस दिले होते ते मिळेपर्यंत दवेने आणखी पैसे पाठवण्यास नकार दिला आणि आरोपीने तिच्याशी सर्व संवाद तोडला,” अशी माहिती पोलिसांनी दिली. त्यानंतर तिला अंदाज आला की आपली फसवणूक झाली आहे. तिने ताबडतोब पोलिसांशी संपर्क साधला.