गूगल (Google) हे जगातील अग्रगण्य सर्च इंजिन नेहमीच महत्त्वाच्या प्रसंगी गूगल डूडलच्या माध्यमातून महत्वाचा संदेश त्यांच्या युजरपरर्यंत पोहचवत असतो. सध्या कोरोना व्हायरस जागतिक आरोग्य संकटाच्या सहाव्या महिन्याच्या टप्प्यावर देखील सामान्यांना COVID-19 चा प्रतिबंध (Covid-19 Prevention) करण्यासाठी 'मास्क घाला जीव वाचवा' (Wear a mask Save lives) हा संदेश देण्यासाठी पुन्हा खास अॅनिमेटेड गूगल डुडल (Google Doodle) साकारण्यात आलं आहे. जगात अजूनही कोविड 19 विरूद्ध लढण्यासाठी आपल्याकडे ठोस उपचार, लस नाही. अशावेळेस बचावात्मक उपाय मास्क घालणं, सोशल डिस्टन्सिंग पाळणं आणि त्यासोबतच नियमित वैयक्तिक स्वच्छता पाळत हात धुत राहणं हीच त्रिसुत्री आपल्याला कोरोना व्हायरसच्या संसर्गापासून वाचवू शकते. पुन्हा सामान्यांना कोरोनापासून दूर ठेवण्यासाठी हाच संदेश गूगलने दिला आहे. Coronavirus Outbreak: मास्क वापरून COVID 19 चा धोका टाळता येऊ शकतो का? जाणून घ्या या '8' टीप्स.
आज गूगलच्या होम पेजवर COVID-19 चा प्रतिबंध साठी एक अॅनिमेटेड Google Doodle साकारण्यात आले आहे. यामध्ये गूगल मधील प्रत्येक अक्षर मास्क परिधान करून आहे. सध्या प्रत्येकाने मास्क घालणं आवश्यक आहे. हाच संदेश यामधून गूगलला पोहचवायचा आहे. मास्क इतरांना मास्क घातलेल्या व्यक्तीपासून व्हायरसचा प्रसार रोखण्यास मदत करू शकते. मात्र केवळ मास्क COVID-19 पासून संरक्षण देत नाही आणि शारीरिक अंतर आणि हात स्वच्छ करून एकत्रित केले पाहिजे. यासोबतच वेळोवेळी कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या नियमावलीचं देखील पालन करा. N-95 Masks with Valved Respirators बाबत केंद्र सरकारने जारी केल्या नव्या सूचना; जाणून घ्या हा मास्क का हानिकारक!
Google कडून COVID-19 चा प्रसार प्रतिबंधित करण्यासाठी शेअर करण्यात आलेल्या टीप्स
- आपले हात वारंवार स्वच्छ करा. साबण आणि पाणी किंवा अल्कोहोल-आधारित हॅंड रब वापरा.
- खोकला किंवा शिंक येणाऱ्या कोणत्याही व्यक्तीपासून सुरक्षित अंतर ठेवा.
- शारीरिक अंतर शक्य नसल्यास मास्क घाला.
- आपल्या डोळ्यांना, नाकाला किंवा तोंडाला स्पर्श करु नका.
- आपण खोकल्यास किंवा शिंकत असल्यास आपले नाक आणि तोंड आपल्या दुमडलेल्या कोपराने किंवा टिश्यूने झाकून टाका.
- आपल्याला अस्वस्थ वाटत असल्यास घरी रहा.
- आपल्याला ताप, खोकला आणि श्वास घेण्यात त्रास होत असेल तर वैद्यकीय सल्ला घ्या.
- आगाऊ कॉल केल्याने आपल्या आरोग्य सेवा प्रदात्याला त्वरित आपल्याला योग्य आरोग्य सुविधेकडे निर्देशित करण्याची परवानगी मिळते. हे आपले संरक्षण करते आणि व्हायरस आणि इतर संसर्गाच्या प्रसाराला प्रतिबंध करते.
भारत आणि त्यातही प्रामुख्याने महाराष्ट्रात पुन्हा कोरोना संसर्गाची स्थिती चिंताजनक बनली आहे. महाराष्ट्रात एकूण कोरोनाबाधितांची संख्या 10.8 लाख पार गेली आहे. तर देशात हाच आकडा 50 लाखांच्या उंबरठ्यावर आहे.
काही दिवसांपूर्वी कोविड योद्धांना सलाम करणारे खास गूगल डुडल साकारण्यात आले होते. यामध्ये कठीण काळात आरोग्य कर्मचारी, पोलिस यंत्रणा ते किराणा माल, औषधं पुरवणारी कर्मचारी मंडळी आपला जीव धोक्यात घालून काम करत असल्याने त्यांच्या सन्मानार्थ खास डूडल प्रसिद्ध करण्यात आले होते.