Mumbai Police Coronavirus Message | Photo Credits: Twitter)

कोरोना व्हायरस (Coronavirus) संकटापासून नागरिकांचा बचाव करण्यासाठी मुंबई पोलीस (Mumbai Police) विविध पद्धतीने जनजागृती करत आहेत. कधी रस्त्यांवर, कधी कायद्याचा धाक दाखवून, तर कधी वेगवेळे मंच वापरुन. सध्या सोशल मीडिया मोठ्या प्रमाणात वापरला जातो. त्यामुळे सोशल मीडियाचा वापर करुनही मुंबई पोलीस मोठ्या प्रमाणावर जनजागृती करत आहे. मुंबई पोलिसांनी आपल्या ट्विटर हँडलवर आज असाच एक हटके संदेश दिला आहे. ज्यात कोरोना व्हायरस विरोधात लढण्यासाठी आणि आपला बचाव करण्यासाठी मास्क वापरणे किती महत्त्वाचे आहे हे सांगितले आहे. मुंबई पोलीसांनी एक GIF इमेज पोस्ट केली आहे. ज्यात वडा, भुर्जी, भजी यांच्यासोबत पावाचे नाते जसे घनिष्ट आहे. तसेच तुमच्यासोबत मास्कचे नाते घनिष्ट असल्याचा संदेश दिला आहे.

वडा,भुर्जी, खिमा, भजी यांच्यासोबत पावाचे नाते सांगताना मानव आणि मास्क यांचे सध्यास्थितीतील घनिष्ट आणि तितकेच महत्त्व सांगताना मुंबई पोलीसांनी Always be pre'pav'ed! असे म्हणत #NoMaskaOnlyMask हा हॅशटॅगही वापरला आहे. मुंबई पोलिसांचा हा हटके संदेश आणि त्यासाठी वापरलेली कल्पना पाहून नेटीझन्सही त्याला चांगलीच दाद देत आहेत. (हेही वाचा, The Punishing Signal: मुंबई पोलीस म्हणतात 'हॉर्न नॉट ओके प्लिज! नाहीतर ट्रॅफिकमध्ये बसा बोंबलत')

मुंबई पोलीस ट्विट

मुंबई पोलीस ट्विट

दरम्यान, मुंबई पोलिसांनी आणखीही एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये ''मास्क हा आता आपल्या चेहऱ्याचे एक आभूषण नव्हे तर एक अवयव बनून नेहमी आपल्या सोबत राहून कोरोना पासून आपले रक्षण करत आहे. काही आरोग्यदायी गॊष्टी आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनवा. घरीच राहा, सुरक्षित राहा,'' असे म्हटले आहे.