कल्पना करा, मुंबई शहरातील कोणत्याही चौकातील एक रस्ता. जिथे सिग्नल लागला असेल. काय दृश्य समोर येते? चौकात येणाऱ्या चारही रस्त्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा.. गोंगाट... आणि त्यात हॉर्नचा आवाज... पीss पॉsss... ढँsssss. या आवाजांमुळे आगोदरच असलेल्या गोंगाटात अधिकच भर पडते आणि मग ध्वनीप्रदुषण होऊन शांततेचा पार विचका होऊन जातो. त्यात जर तो परिसर शांतता क्षेत्र असेल तर मग विचारुच नका. म्हणूनच मुंबई पोलीस (Mumbai Police) आता अधिक दक्ष झाले आहेत. त्यांनी शांतता क्षेत्रात ध्वनिप्रदूषन टाळण्यासाठी एक नवी वाहतूक नियमावली लागू करण्याचा विचार केला आहे. चौकांमध्ये सिग्नलदरम्यान, होणाऱ्या ध्वनिप्रदूषनाला आळा घालण्यासाठी मुंबई वाहतूक पोलिसांनी एफसीबी इंटरफेस कंपनीसोबत करार करत द पनिशिंग सिग्नल (The Punishing Signal) नामक एक यंत्रणा कार्यक्नित करायचा विचार केला आहे.
द पनिशिंग सिग्नल नामक यंत्रणेमुळे मुंबईत प्रवास करणाऱ्या वाहन चालक, मालक आणि मुंबईकरांना स्वत:हूनच काही गोष्टींचे बंधन घालून घ्यावे लागणार आहे. कारण ही यंत्रणाच तशी काम करणार आहे. द पनिशिंग सिग्नल नामक यंत्रणा शांतता क्षेत्र असणाऱ्या भागात सुरु करण्यात येणार आहे.
द पनिशिंग सिग्नल नामक यंत्रणा ही शहरांती चौकांमध्ये बसविण्यात येणार आहे. या यंत्रणेमध्ये त्या चौकामध्ये असलेल्या ध्वनिप्रदूषणस कारण ठरणाऱ्या आवाजाचा डेसीबल मोजण्यात येईल. ज्यामुळे शांतताभंग करणाऱ्या मंडळींना चांगलाच धडा मिळणार आहे. शहातील कोणत्याही चौकात लाल सिग्नल लागला की थांबा आणि हिरवा असेल तर पुढे जा असा नियम आहे. परंतू, लाल दिवा लागला रे लागला की चालक मंडळी जोरजोरात हॉर्न वाजवायला सुरु करतात. या हॉर्न वाजविण्याने वाहनांची रहदारी संपते असे मुळीच नाही. पण, आता ती सवयच झाली आहे. शातता परिसरात यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास होतो. म्हणूनच मुंबई पोलीसांनी ही यंत्रणा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. समोर लाल दिवा लागला आणि चालकांनी हॉर्न वाजविण्याचा प्रयत्न केला. त्याचा आवाज जर 85 डेसीबल पेक्षा वर गेला तर सिग्नलचा कालावधी आणखी वाढणार आहे. हा आवाज जितका वाढत जाईल तितका हा कालावधी वाढत जाईल. जोपर्यंत ध्वनिमापक यंत्राचा आवाज 85 डेसीबलपेक्षा खाली येत नाही तोवर हिरवा दिवाच पेटणार नाही. त्यामुळे वाहन चालकांना आपोआपच स्वत:वर नियंत्रण मिळवत पोलीसांना सहकार्य करावे लागणार आहे. (हेही वाचा, खबरदार! वाहतुकीचे नियम मोडाल तर, होईल 25,000 रुपये दंड, 3 वर्षे तुरुंगवास; जाणून घ्या New Traffic Rules in India 2019)
मुंबई पोलीस ट्विट
Horn not okay, please!
Find out how the @MumbaiPolice hit the mute button on #Mumbai’s reckless honkers. #HonkResponsibly pic.twitter.com/BAGL4iXiPH
— Mumbai Police (@MumbaiPolice) January 31, 2020
मुंबई पोलीसांनी द पनिशिंग सिग्नल नामक यंत्रणेचा प्रसार शहरभर सुरु केला आहे. मुंबई पोलीसांनी त्याबाबत ट्विटरवर एक व्हिडिओही शेअर केला आहे. या व्हडिओत या यंत्रणेबद्दल माहिती सांगण्यात आली आहे. Horn not okay, please! असे म्हणत पोलिसांनी या यंत्रणेचे कॅम्पेन सुरु केले आहे.
मुंबई पोलीस ट्विट
उगा कशाला हॉsर्न वाजवी.. काना येईल बहिरेपणा...
वृद्ध ,बालक अन् कुणी आजारी.... फिकीर त्यांची करा जरा...
जी जी रं जी....
— Mumbai Police (@MumbaiPolice) January 31, 2020
दरम्यान, सीएसएमटी, मरीन ड्राईव्ह, पेडर रोड, हिंदमाता आणि वांद्रे अशा परिसरात प्रथम या यंत्रणेचा वापर करण्यात येणार आहे. या यंत्रणेबद्दल माहिती देताना 'उगा कशाला हॉsर्न वाजवी.. काना येईल बहिरेपणा... वृद्ध ,बालक अन् कुणी आजारी.... फिकीर त्यांची करा जरा...जी जी रं जी....' असे म्हणत मुंबई पोलीसांनी ट्विटही केले आहे.