Pakistan Minister Dr Firdous Ashiq Awan's Bizzare COVID-19 Advice (Photo Credits: Screengrab/Twitter)

कोरोना व्हायरसला (Coronavirus) रोखण्यासाठी जगभरातील अनेक वैद्यकीय तज्ञ दिवसरात्र मेहनत करत आहे. यासाठी सार्वजनिक ठिकाणी जाऊ नका, मास्क घालून वावरा, हात स्वच्छ धूत जा अशा अनेक सूचना सरकारच्या माध्यमातून अगदी जागतिक स्तरावर देण्यात येत आहेत. अशातच पाकिस्तानच्या (Pakistan) मंत्री डॉ. फिरदौस आशिक अवान (Dr Firdous Ashiq Awan) यांनी एक विचित्रच सल्ला लोकांना दिला आहे. "कोरोना व्हायरस कुठूनही शरीरात शिरकाव करू शकतो, अगदी खालून सुद्धा कोरोना  आत जाऊ शकतो.  तुम्ही तुमच्या पायांना सुद्धा सुरक्षितपणे बंद ठेवा" असे विचित्र मत फिरदौस अवान यांनी मांडले आहे. डॉ. फिरदौस आशिक अवान या पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान (Pakistan PM Imran Khan) यांना माहिती आणि प्रसारण मंत्रालयातील विशेष सल्लागार म्ह्णून काम करतात. डॉ. अवान यांच्या या सल्ल्याचा एक व्हिडीओ सुद्धा ट्विटर वर पाहायला मिळत आहे ज्यावर साहजिकच नेटकऱ्यांनी मनसोक्त ट्रोलिंग केले आहे.

डॉ. फिरदौस आशिक अवान यांनी व्हिडिओत म्हंटल्याप्रमाणे, "तुमचे अंग, पाय, हात सगळं काही सुरक्षित ठेवा, कोरोनापासून वाचण्यासाठी केवळ तोंड कव्हर करून काहीही होणार नाही हा कोरोना 'नीचे से' म्हणजेच खालूनही शरीरात घुसू शकतो. हे एक वैद्यकीय विज्ञान आहे याची काळजी आपण सर्वांनी एकत्र घ्यायची आहे".(हे ही वाचा - पाकिस्तानमध्ये कोरोनाचा उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी अशा प्रकारे वाढवला रुग्णांचा उत्साह, गौतम गंभीरने शेअर केला व्हायरल व्हिडिओ)

पहा व्हिडिओ

दरम्यान, डॉ. फिरदौस आशिक अवान यांच्या या हटके दाव्याची कोणतीही वैज्ञानिक पुष्टी झालेली नाही. त्यामुळे हा व्हिडीओ सोशल मीडियावर थट्टेचा विषय ठरत आहे. यापूर्वी सुद्धा काही देशातील उच्च पदावरील मंडळींनी अशीच विचित्र बतावणी केली आहे. बेलारुसचे राष्ट्रपती यांचा वोडका प्यायल्याने कोरोना बारा होत असल्याचा दावा, केनियाचे राज्यपाल माईक सँको यांचा दारूने कोरोना नष्ट होईल हा सेवा ही याचीच उदाहरणे म्हणता येईल.

हे सर्व दावे जागतिक आरोग्य संघटनेने वेळोवेळी अमान्य केले आहेत अजूनही कोरोनावरील एक निश्चित उपचार सापडलेला नाही त्यामुळे लोकांनी अशा दाव्यांवर विश्वास ठेवू नये